देवी कुष्मांडा । Devi Krushmanda

Devi Krushmanda

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ (Devi Krushmanda) आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अदाहत’ चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे.

तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत.

ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो.

या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.


कूष्मांडा देवीचे स्वरुप Devi Krushmanda Swaroop

दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे.


कूष्मांडा देवीचे पूजन

सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कूष्मांडा स्वरुपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती, आपापल्या पद्धती, परंपरांनुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, असे सांगितले जाते.


कूष्मांडा देवीचा मंत्र

कूष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा. शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


कूष्मांडा देवीची महती

दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरुपाचे नाव कूष्मांडा आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कूष्मांडा देवी असे म्हटले जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर मनाने कूष्मांडा देवीची पूजा, उपासना करावी, असे सांगितले जाते. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. कूष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.


Devi Krushmanda अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.


देवीची महती

Devi Chandraghanta
Devi Chandraghanta
mata shailyaputra
Mata Shailyaputra
Scroll to Top