Dalimb Chi Mahiti | Dalimb Che 5+ Attractive Upayog

Dalimb Chi Mahiti

दोस्तांनो, डाळिंबाचे लालचुटूक दाणे कोणालाही त्यांच्या मोहात पाडू शकतात. डाळिंब सोलायला थोडा त्रास होत असला, तरी त्याची रसाळ गोडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. डाळिंब हे सामान्यतः सर्व ऋतूत उपलब्ध होणारे फळ असून, त्याची साल व दाणे दोन्हीही गुणकारी आहेत. डाळिंबापासून सरबत, जैली, आइस्क्रीम वगैरे तयार करतात. चला तर, जाणून घेऊया Dalimb Chi Mahiti.


Dalimb Che Shashriya Naav | डाळिंब चे शास्त्रीय नाव

डाळिंब हे एक मोठे पानझडी झुडूप आहे. ही वनस्पती प्युनिकेसी कुळातील असून, तिचे शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनॅटम आहे. या वनस्पतीचे मूलस्थान पश्चिम आशियातील इराण व इराक आहे. तेथून तिचा प्रसार वायव्य भारतात घडून आला. स्पेन, टर्की, इराण, इराक, सीरिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, चीन, इझाईल इत्यादी देशांत डाळिंबांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतात महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांत लागवड होते. डाळिंब लागवडीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.


Dalimb Chi Mahiti। डाळिंबाची माहिती

डाळिंबाचे झुडूप सुमारे ५ ते ८ मी. उंच वाढते. खोड लहान, मजबूत व राखाडी रंगाचे असते. फांद्या गुळगुळीत व खोडाप्रमाणेच राखाडी रंगाच्या असतात. फांद्यांना काटे असतात. पाने साधी, लांबट व समोरासमोर असतात. फुले मोठी, लाल, क्वचित पिवळी व फांदीच्या टोकाला येतात. ती एकटी किंवा दोन ते चारच्या झुबक्यांनी येतात. फळे गोल, लाल व काष्ठीय असतात. फळात बियांभोवती लाल व रसाळ गराचे आवरण असते. बिया अनेक व कोनीय असून, त्या पातळ पांढऱ्या पापुद्र्यात असतात.


Dalimb Che Aushadhi Gundharm । डाळिंब चे औषधी गुणधर्म

  • डाळिंबाच्या मुळांची आणि खोडाची वाळलेली साल कृमींवर गुणकारी असून, तिचा वापर फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. फळांचा ताजा रस शीतल असून, अपचनाच्या विकारांवरील औषधात त्याचा वापर करण्यात येतो.
  • फळांची साल अतिसार आणि आमांश या विकारांवर गुणकारी आहे.
  • डाळिंबाचे गोड प्रकार सौम्यसारक असून, कमी गोड प्रकार हृदयवेदनांवर आणि जठराच्या सुजेवर गुणकारी आहेत असे म्हणतात. कळ्यांची पूड श्वसननलिका दाहावर वापरतात. बिया पाचक आणि भूक वाढविणाऱ्या असून, बियांवरील गर हृदयाच्या व पचनाच्या तक्रारींवर गुणकारी आहे.

Dalimb Baddal Tumhala he Mahit Ahe ka? | डाळिंब बद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

  • क-जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असते. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी या फळाचा वापर केला जातो. फळाचा स्वादिष्ट रस विकला जातो आणि त्यापासून रुचकर पेये, मद्य बनवतात.
  • फळांच्या, खोडाच्या व मुळांच्या सालीचा वापर कच्ची कातडी कमावण्यासाठी भूमध्य समुद्राभोवतालच्या देशांत फार वर्षांपासून होतो आहे. मोरोक्को या चामडे कमावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या सालीचा वापर केला जात असे.

Dalimb Che Upayog | डाळिंब चे उपयोग

  1. डाळिंब खाण्यासाठी व औषधासाठी वापरले जाते.
  2. डाळिंबाच्या रसात पोटॅशियमयुक्त खनिजे, शर्करा आणि क-जीवनसत्त्वे व ब-समूह जीवनसत्त्वे असतात. आयुर्वेदात प्राचीन काळापासून डाळिंबाचा वापर केला गेला असल्याचे संदर्भ आढळतात.
  3. फळाची आणि वृक्षाची साल जुलाब, हगवण आणि पोटाच्या तक्रारींवर गुणकारी असते.
  4. हृदय व घसा या अवयवांसाठी फळांचा रस पौष्टिक असतो.
  5. डाळिंबाच्या झुडपाचा आकर्षक कुंपणासाठी वापर करण्यात येतो.
  6. बागेत शोभेसाठी दुहेरी फुले येणारे डाळिंब लावतात.
  7. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीरमधील वनांत वाढणाऱ्या डाळिंबाच्या बिया गरासह वाळवून त्या ‘अनारदाना’ या नावाने विकल्या जातात.

फुलांपासून फिकट तांबडा रंग काढतात व तो कापड रंगवण्यासाठी वापरतात.

केसाचे कलप व दातांचे रोपण बनवण्यासाठी फळांच्या व मुळांच्या सालींचा उपयोग करतात.

काळी शाई बनविण्यासाठी मुळांची साल वापरतात.

Dalimb Chi Mahiti


अक्रोड बद्दल संपूर्ण नविन माहिती 5+ Amazing फायदे

Acrod Che Fayde
Acrod Che Fayde

डाळींबने शुगर वाढते का?

डाळिंब हे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्यदायी आहाराचा एक भाग असू शकतो, परंतु ते कमी प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. डाळिंबासह कोणतेही फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

डाळिंब कोणी खाऊ नये?

तुम्हाला मधुमेह असल्यास, डाळिंबासह फळांचे रस पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना विचारा. जुलाब होत असल्यास डाळिंबाचा रस पिऊ नका किंवा डाळिंबाचा अर्क घेऊ नका. गर्भवती महिलांनी डाळिंबाचा अर्क घेऊ नये कारण त्यात फळाची साल असू शकते. हा रस मात्र सुरक्षित मानला जातो.

रोज डाळिंब खाल्ल्यास काय होईल?

दररोज डाळिंब खाणे, किंवा त्याचा रस पिणे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी उत्कृष्ट मदत असू शकते, टाइप-2 मधुमेहाशी लढा देऊ शकते, रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकते, पचन सुरळीत ठेवते आणि तुमची त्वचा देखील चमकदार बनते.

नाश्त्यासाठी डाळिंब चांगले आहे का?

सकाळी डाळिंब खाण्याचा प्रयत्न करा कारण ते कॅलरीजमध्ये समृद्ध आहे आणि चांगली ऊर्जा प्रदान करते . जास्त प्रमाणात खाणे टाळा कारण ते तुमच्या चयापचयात व्यत्यय आणू शकते आणि बद्धकोष्ठता किंवा पाचन समस्या निर्माण करू शकते.


Dalimb Chi Mahiti साठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण Dalimb Chi Mahiti मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top