Fanas chi Mahiti। Fanasache 5 Important Gundharm

Fanas chi Mahiti

मित्र-मैत्रिणींनो, आपण संपूर्ण Fanas chi Mahiti घेऊयात. दर वर्षी उन्हाळ्याची चाहुल लागली की, आंब्याबरोबरच फणसाचेदेखील बाजारात आगमन होते. बाजारात फणस किंवा त्याचे गरेही विक्रीला आलेले दिसतात. बाहेरून काटेरी असलेले हे फळ आतून मात्र गोड असते. फणसाची पोळी, जेली, चॉकलेट अशी विविध उत्पादने तयार करतात. जाणून घेऊया आकाराने मोठ्या आणि वजनाने जड असलेल्या या फळाबद्दल…


फणस ची शास्त्रीय माहिती । Fanas chi Shasriya Mahiti

फणस हा मोरेसी कुलातील सदाहरित वृक्ष असून, त्याचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस हेटरोफायलस आहे. वड, अंजीर, उंबर इ. वनस्पती याच कुलात मोडतात. फणसाचे मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे, असे मानतात. आशियातील भारत, बांगलादेश, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलँड, मलेशिया व इंडोनेशिया, तसेच आफ्रिकेतील युगांडा, मॉरिशस आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील इ. देशांमध्ये फणस लागवडीखाली आढळतो. भारतात दक्षिण भागातील किनारी प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथे त्याची लागवड केली जाते. फणस हे बांगलादेशाचे राष्ट्रीय फळ आहे.


फणस वृक्षाबद्दल माहिती

फणस वृक्ष १८ ते २५ मीटर उंच वाढतो. खोडाची साल जाड, काळसर व भेगाळलेली असते. पाने साधी, मोठी, गर्द हिरवी, वरून चकचकीत, तर खाली फिकट, लंबगोल व गुळगुळीत असतात. फुले एकलिंगी असतात. नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या फुलोऱ्यांत येतात. फळे मोठी, गोल किंवा लंबगोल आणि बाहेरून काटेरी असतात. फणसाचे संयुक्त फळ हे अनेक फुलांपासून तयार झालेले असते. याला सरसाक्ष प्रकार म्हणतात. फळे झाडाच्या मुख्य खोडावर आणि येतात. फळ वजनदार असते. सुरुवातीला हिरवे असणारे फळ पिकले की, पिवळसर किंवा तपकिरी दिसते. फळात लहान-लहान कप्पे असतात. त्या प्रत्येक कप्प्यात एक बी असते. बी आठळीसारखी असून, तिच्याभोवती मृदू पिवळसर रंगाचा गोड गर असतो.


फणसाचे प्रकार

भारतात लागवडीखाली असलेल्या फणसाच्या फळांचे ढोबळमानाने काषा व बरका असे दोन प्रकार मानले जातात. कापा प्रकारच्या फळातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर असतात. बरका प्रकारातील फणसांचे गरे नरम, बिळबिळीत, चवीला कमी गोड किंवा सपक असतात. कापा फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते असतात; तर बरका फणसावरील काटे आखूड व पसरट असतात. याखेरीज तमिळनाडूत लागवड होणारा रुद्राक्षी हा एक प्रकार आहे. त्याची फळे लहान व सालीवर कमी काटे असलेली असतात. श्रीलंकेमधून सिंगापुरी नावाचा प्रकार भारतात आला आहे. त्याची फळे सामान्य फणसाच्या हंगामापेक्षा वेगळ्या हंगामात येतात.


फणसाचे गुणधर्म कोणते?

  1. फणसाचे गरे, लहान मुलांच्या शक्तीप्रमाणे खाण्यास द्यावे. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी मदत होते.
  2. फणसाची मुळे अतिसारावर उपयोगी पडतात.
  3. फणसाची आठळी भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.
  4. सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावेत, यामुळे सांध्यांवरची सूज कमी होऊन आराम मिळतो.
  5. शरीरावर बेंड आले असेल, तर फणसाचा चीक उपयोगी पडतो. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी होऊन ते पिकते व त्यात असणाऱ्या वाईट स्त्रावाचा (पू) निचरा होतो.

फणसाचे पोषणमूल्य

फणसात भरपूर प्रमाणात पोषणमूल्य असते. यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे (विशेषतः व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन A), आणि खनिजे (पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम) असतात. फणसाच्या सेवनाने इम्यून सिस्टीम मजबूत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पचनसंस्था सुधारते.


फणसाबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

  • फणसापासून जॅम, जेली, लोणची व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळा फणस भाजीसाठी वापरतात.
  • फणसाचे लाकूड जॅकवूड नावाने प्रसिद्ध असून, ते फर्निचरसाठी वापरतात. त्याला वाळवी लागत नाही.
  • काळ्या मिरीची वेल आधारासाठी बऱ्याचदा फणसाच्या झाडावर चढवितात.

फणसाचं आर्थिक महत्त्व

फणसाचे आर्थिक महत्त्वही मोठे आहे. भारतात विशेषतः केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात फणसाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. फणसाची फळे स्थानिक बाजारात विकली जातात तसेच निर्यातही केली जाते. फणसाच्या बिया आणि फणसापासून तयार केलेले विविध पदार्थही विकले जातात.


निष्कर्ष | Conclusion on Fanas chi Mahiti

फणस हे एक महत्वाचे फळ आहे ज्याचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि आर्थिक महत्त्व आहे. फणसाच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. फणसाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. फणसाच्या विविध उपयोगांमुळे त्याचे विशेष स्थान आहे. फणसाच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. फणसाच्या शेतीतून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते.


FAQ on Fanas chi Mahiti

फणस किती दिवसात पिकतो?

अगदी ८-१० दिवसात फणस पिकतात.

फणस खाल्ल्यानंतर काय पिऊ नये?

फणस बरोबर दुग्धजन्य पदार्थ किंवा कार्बोनेटेड पेयांसह सेवन करू नये. एकाच वेळी सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे अपचन आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात असे मानले जाते.


अक्रोड बद्दल संपूर्ण नविन माहिती 5+ Amazing फायदे

Acrod Chi Mahiti
Acrod Chi Mahiti

Fanas chi Mahiti साठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण Fanas chi Mahiti मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top