Jambhul in Marathi । 5 आरोग्यदायी फायदे: जांभूळ चे संपूर्ण माहिती आणि आश्चर्यकारक Amazing गुण!

Jambhul in Marathi

दोस्तांनो, गोड-आंबट चवीची जांभळं खायला खूप मजा येते हो ना? जांभूळ खाल्ल्यावर आपली जीभही त्याच्याच रंगाने रंगून जाते. त्यामुळे तुम्हा मुलांना तर फारच धमाल येते. जांभळाच्या बिया वाळवून त्यांचा उपयोग विविध खेळांसाठीही मुलं करतात. चला तर, जाणून घेऊया अतरंगी जांभळाविषयी…Jambhul in Marathi Mahiti

जांभुळ शास्त्रीय माहिती | Jambhul Shrashriya Mahiti in Marathi

जांभळाला हिंदीत जामुन व काला जाम, गुजरातीमध्ये जांबुडा, संस्कृतमध्ये जंबु, महास्कंध, नीलफल, इंग्रजीत ब्लॅक प्लम, जावा अॅपल असे म्हणतात. मूळचा भारताच्या पश्चिम घाटातील हा सदापर्णी व दाट छाया देणारा मोठा वृक्ष आता भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, मलाया आणि ऑस्ट्रेलिया येथे रस्त्यांच्या दुतर्फा, बागेत आणि शेतात लावलेला आढळतो. बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र व महाभारताच्या आरण्यक पर्वात जम्बुवृक्षाचा उल्लेख आला आहे.

हे झाड असेल तेथे जमिनीत पाणी सापडेल अशी नोंद आहे. प्राण्यांद्वारे विखुरलेल्या बियांपासूनही अनेक ठिकाणी हा वृक्ष उगवल्याचे आढळते. झाडाची पाने साधी, समोरासमोर, चिवट, गर्द हिरवी, टोकदार, लंबगोल व त्यांच्यावर अंतर्धारी (कडांजवळून जाणारी) शीर असते. फुलोरे शाखायुक्त आणि शेवटी गुच्छाप्रमाणे असून, त्यांवर मार्च-मेमध्ये लहान, पांढरट किंवा हिरवट सुगंधी फुले येतात.

जांभुळ औषधी फायदे | Jambhul che Fayde in marathi​

  • जांभळांचा हंगाम अतिशय कमी दिवसांचा असतो. त्यामुळे सर्वांनीच याचा आवर्जून आस्वाद घ्यावा, जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.
  • पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे.
  • यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ७-८ जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर १५ मिनिटे उकळवावीत त्यानंतर जांभळातील बीसह जांभळांचा पाण्यामध्ये लगदा करावा व हे द्रावण दिवसभरात ३-४ वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते व यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.
  • दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल, तर जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.
  • जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते.
  • जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते, तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोड्या प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलिन व फोलिक आम्लही असते.

जांभुळ विविध उपयोग । Jambhul che Upayog in marathi​

या झाडाचे लाकूड लालसर करडे, मध्यम कठीण व पाण्यातही टिकाऊ असते. ते घरबांधणी, खांब, तुळया, गाड्या, नावा व शेतीची अवजारे इत्यादींकरिता उपयुक्त असते.

  1. सालीतील टॅनिनामुळे ती कातडी रंगवण्यास व कमाविण्यास वापरतात.
  2. पक्व फळे लोक आवडीने खातात. ती गोड, आरोग्यास हितकर व स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) असतात. त्यांच्यापासून मद्यही तयार करतात.
  3. फळांचा उपयोग औषधांकरिता होतो. पोटाच्या तक्रारीवर व मधुमेहावरही फळे उपायकारक ठरतात.
  4. बिया गुरांना चारतात. पाने रेशमी किड्यांना पोसण्यास उपयुक्त ठरतात.
  5. आयुर्वेदीय चिकित्सेत अतिसार झाल्यास जांभळाची पाने आणि साल उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

झाडाची माहिती | Jambhul Jhazabaddal Mahiti

जांभळाचे झाड साधारणपणे ५० ते ६० वर्षे जगते. ते १० ते १५ मीटर उंच वाढते. उष्ण आणि समशीतोष्ण हवामानातले हे झाड शीत हवामानातही वाढते. समुद्रसपाटीपासून ६०० मीटर हून जास्त उंचीवरील प्रदेशात ते चांगले वाढत नाही. जांभळाला फुले यावयाच्या वेळी व फलधारणेच्या वेळी हवामान कोरडे असावे लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसाने फळे चांगली पोसतात, पिकलेल्या फळांना रंग चांगला येऊन त्यांना चवही चांगली येते. मध्यम खोलीच्या व पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. रोपापासून वाढविलेल्या झाडाला ८ ते १० वर्षांनंतर फळे येऊ लागतात.

फळांच्या सालीचा बाहेरचा भाग काळा दिसतो, पण आतला गर तांबूस गुलाबी असतो. त्याची चव आंबट-गोड आणि किंचित तुरट असते. साल फार पातळ असल्यामुळे पक्व फळे फार काळजीपूर्वक हाताळावी लागतात. मोठी फळे असलेल्या झाडांना ‘रायजांभूळ’ म्हणतात. प्रत्येक झाडापासून दरसाल ५० ते ७५ किलोग्रॅम फळे मिळतात.

Jambhul in Marathi साठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण Jambhul in Marathi मध्ये मिळते.

फणस बद्दल तुम्हाला हि नवीन माहिती आहे का?

Fanas chi Mahiti
Fanas chi Mahiti
Scroll to Top