श्री शिवलीलामृत अध्याय सातवा (७) | Shree Shivleelamrut Adhyay Satava (7)

Shree Shivleelamrut Adhyay Satava
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Pachava
Shree Shivleelamrut Adhyay Pachava
Shree Shivleelamrut Adhyay Sahava
Shree Shivleelamrut Adhyay Sahava

सूत पुढे श्रोत्यांना सांगतात ऐका विदर्भ देशात वेदमित्र व सारस्वत वेदशास्त्रसंपन्न दोन ब्राह्मण मित्र राहत होती. त्यातील वेदमित्राला सुमेधा नावाचा व सारस्वताला सोमवंत नावाचा असी मुले होती. त्या दोन्ही मुलाची ही खुप मैत्री होती. त्या दोघांनाही सोळा वर्षे विद्याभ्यास पूर्ण करून अनेक ठिकाणी आपल्या विद्वत्तेवर प्रावीण्य मिळवीले त्यांच्या वडिलांनी द्रव्यप्राप्तिसाठी राजाकडे पाठविले. ते सर्वगुण संपन्न पाहुन राजा म्हणाला नैषध नगरीचा राजा चित्रांगद त्याची पत्नी सीमंतिनी ही शिवव्रत करत आहे व नेहमी दांपत्यांची पूजा करते. अशी तीची किर्ती सर्वत्र पसरली आहे. तेंव्हा तुम्हा पैकी एकाने स्त्रीवेष घेवून दांपत्य म्हणून जावे तेथे सीमंतिनी तुमची पूजा करून तुम्हाला भरपूर द्रव्य देईल व मीही तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईल. त्याप्रमाणे ते दोघे दांपत्यवेष घेवून सिमंतिनीच्या पूजेच्या वेळी समारे येवून उभे राहीले सिमंतिनीने त्यांना ओळखले कि हे दोघे पुरूष आहे. परंतु दोघांचीही दांपत्य म्हणून पूजा केली व भरपूर द्रव्य देवून प्रेमाने निरोप दिला. घराकडे परत निघाले तेंव्हा सोमवंतला आपण खरोखरच स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला ते घरी आले त्याचा पिता सारस्वत त्याला कळाले तो राजाकडे जावून खुप रागावला राजाने क्षमा मागीतली व देवीची उपासना केली.

देवी प्रसन्न होऊन तीने हा स्त्रीच राहणार आहे म्हणुन सुमेधाबरोबर लग्न करून द्या असे सांगितले कारण सिमंतिनीच्या व्रताचा प्रभाव अपार आहे. पुढे दुसरी कथा सांगितली. अवंती नगरीत एक ब्राह्मण होता तो अती कामुक असुन पिंगला नामक वेश्ये बरोबर रत असे स्वधर्म सोडून मद्यमांस खातपित असे. एकवेळ शिवयोगी पिंगळेकडे आला दोघांनीही त्याची पूजा व उत्तम सेवा केली त्या पुण्याईने पिंगला सीमंतिनीच्या पोटी किर्ती मालिनी नावाने जन्माला आली व ब्राह्मण दाशार्ह देशाचा राजा वज्र बाहुची पत्नी सुमतीच्या पोटी जन्माला आला. परंतु सुमती गरोधर असतांना तीच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केल्यामुळे दोघाही आई-मुलांच्या अंगी रोग जडला त्या योगे राजाने तिला जंगलात सोडून दिले तिला एक वाणी भेटला त्याने नगरात आनली पुढे राजा पद्माकर यांची भेट झाली त्यांनी धर्मकन्या म्हणून तीचा सांभाळ केला तीचा रोगाने मुलगा मृत्यु पावला. ती शोक करू लागली त्याठिकाणी एक योगी येवून तीला उपदेश केला व भस्म अभिमंत्रीत करून त्यांच्या अंगास लावले दोघेही रोग मुक्त झाले व मुलगा जीवंत झाला. हा चमत्कार पाहुन सर्वांना अत्यानंद झाला. योगी मुनीने मुलाचे भद्रायु असे नाव ठेवले व उत्तम आशीर्वाद देवून अदृष्य झाला.

श्री शिवलीलामृत : अध्याय सातवा (Shree Shivleelamrut Adhyay Satava)

श्रीगणेशाय नमः ।। जय जय किशोरचंद्रशेखरा ।। उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ।। भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा ।। लीला विचित्रा तूझिया ।। १ ।। भानुकोटितेज अपरिमिता ।। विश्वव्यापका विश्वनाथा ।। रमाधवप्रिया भूताधिपते अनंता ।। अमूर्तमूर्ता विश्वपते ॥२॥ परमानंदा पंचवक्त्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ परमपावना पयःफेनगात्रा ।। परममंगला परब्रह्मा ॥ ३ ॥ मंदस्मितवदन दयाळा ।। षष्ठाध्यायीं अतिनिर्मळा ।। सीमंतिनीआख्यानलीला ।। स्नेहाळा तूं वदलासी ॥४॥ श्रीधरमुख निमित्त करून ॥ तूंचि वदलासी आपुले गुण ॥ व्यासरूपें सूतास स्थापून ।। रसिक पुराण सांगविसी ॥५॥ ऐसें ऐकतां दयाळ ॥ वदता झाला श्रीगोपाळ ॥ विदर्भनगरीं एक सुशीळ ॥ वेदमित्रनामें द्विज होता ॥६॥ तो वेदशास्त्रसंपन्न ।। त्याचा मित्र सारस्वतनामें ब्राह्मण ।। वेदमित्रास पुत्र सगुण ।। सुमेधा नामें जाहला ॥७ ॥ सारस्वतसुत सोमवंत ॥ उभयतांचें मित्रत्व अत्यंत ।। दशग्रंथी ज्ञान बहुत ।। मुखोद्गत पुराणें ॥८॥

श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्‌गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. मस्तकावर चंद्रमा धारण करणाऱ्या, पार्वतीचा पती असलेल्या, नागांच्या भूषणांनी नटलेल्या, सप्तरंगी सूर्यकिरणाप्रमाणे नेत्र असलेल्या, हे रमामाधवास प्रिय असलेल्या शिव शंभूनाथा, तुझी लीला अगम्य आहे.।।१।। कोटी सूर्याचे तेज असलेल्या, जो अमर्याद आहे, अशा विश्वव्यापका, शिव-भूत गणांच्या नायका, हे अनंता, हे अमृतेश्वरा, तू श्रेष्ठ आहेस. ।।२।। तू परम आनंद देणारा, पंचमुखाचा पंधरा नेत्र असलेला आणि दुधासारखा धवल असलेल्या हे परम मंगल परमात्म्या तुला वंदन असो.।।३।। हे मंद, स्मत करणाऱ्या देवा, तूच माझ्या मुखातून या ग्रंथाच्या मागील सहाव्या अध्यायात ते सीमंतिनीचे आख्यान वदविलेस; ।।४।। या श्रीधराच्या मुखाचे निमित्त करून तूच तुझ्या लीलांचे वर्णन करीत आहेस. व्यासपुत्र सूताच्या द्वारे तूच ही पुराणकथा समस्त श्रोत्यांना सांगत आहेस. ।।५।। हे स्तवन ऐकून तो शिवगोपाळ पुढील कथेचे निवेदन करू लागला. त्याने सांगायला सुरुवात केली की, विदर्भनावाच्या एका नगरीत वेदमित्र नावाचा एक ब्राह्मण राहात होता. ।।६।। तो वेदशास्त्रसंपन्न होता, त्याचा एक मित्र होता त्याचे नाव सारस्वत. वेदमित्रास एक मुलगा होता, त्याचे नाव होते सुमेधा ॥७॥ तसेच सारस्वतासही एक पुत्र होता, त्याचे नाव होते सोमवंत. ते दोघेही विप्रकुमार एकमेकांचे मित्र आणि सहाध्यायी होते. त्या दोघांना दशग्रंथांचे ज्ञान तर होतेच, तसेच त्यांना अनेक पुराणेही मुखोद्गत होती. ।।८।।

संहिता पद क्रम अरण ब्राह्मण ॥ छंद निघंटु शिक्षा जाण ।। ज्योतिष कल्प व्याकरण ।। निरुक्त पूर्ण दशग्रंथीं ।।९।। ऐसा विद्याभ्यास करितां ।। षोडश वर्षे झालीं तत्त्वतां ।। दोघांचे पिते म्हणती आतां ।। भेटा नृपनाथा वैदर्भासी ॥१०॥ विद्या दावूनि अद्भुत ॥ मेळवावें द्रव्य बहुत ॥ मग वधू पाहूनि यथार्थ ।। लग्नें करूं तुमचीं ॥११॥ यावरी ते ऋषिपुत्र ॥ विदर्भरायासी भेटले सत्वर ॥ विद्याधनाचें भांडार ।। उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥ १२ ॥ विद्या पाहतां तोषला राव ।। परी विनोद मांडिला अभिनव ।। म्हणे मी एक सांगेन भाव ।। धरा तुम्ही दोघेही ॥१३॥ नैषधपुरीचा नृपनाथ ।। त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात ।। मृत्यंजयमृडानीप्रीत्यर्थ ।। दांपत्यपूजा करी बहु ॥ १४ ॥ तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी ।। होवोनि जावें ये क्षणीं ।। दिव्य अलंकार बहुत धनीं ।। पूजील तुम्हांकारणें ॥ १५ ॥ तेथोनि यावें परतोन ।। मग मीही देईन यथेष्ट धन। मातापितागुरुनृपवचन ॥ कदा अमान्य करूं नये ।॥१६॥ तंव बोलती दोघे किशोर ।। हैं अनुचित कर्म निंद्य फार ।। पुरुषास स्त्रीवेष देखतां साचार ।। सचैल स्नान करावें ।॥१७॥

त्यांना संहिता, पद, क्रम, आरण्यक, ब्राह्मण, छंद, निघंटु, शिक्षा, भविष्य, कल्प, व्याकरण आणि निरुक्त असे सर्व ग्रंथ ज्ञात होते. ।।९।। अशाप्रकारे जेव्हा हा सारा अभ्यास करताना ते दोघे सोळा वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या पित्यांनी त्यांना तुम्ही नगरीच्या राजाची जाऊन भेट घ्या असे सुचविले. ।।१०।। दोघांचेही वडील त्यांना म्हणाले की, “तुम्ही नगरीच्या राजाकडे जा. त्याला तुमचे ज्ञान, गुण, कला दाखवा. त्या गुणग्राही राजाकडून धनसन्मान मिळवून या. मग आम्ही चांगला सुंदर मुली पाहून तुमचे विवाह करून देऊ.”।।११।। पित्याच्या सल्ल्यानुसार ते कुमार विदर्भनगरीच्या राजाकडे गेले आणि त्यांनी राजासमोर आपले ज्ञान, कला, गुण हे दाखविले. ।।१२।। त्या दोन्ही मुलांचे ज्ञान आणि कला निपुणता पाहून राजा खूश झाला. पण तो त्यांना असे म्हणाला की मी तुम्हास एक गोष्ट करायला सांगतो. त्यानुसार तुम्ही करा. ।।१३।। हे पाहा नैषध देशाची राणी सीमंतिनी ही नेहमी शिव-पार्वती मानून दांपत्याचे पूजन करून त्यांना धन देते. ।।१४।। तुम्ही दोघांनी स्त्री-पुरुष अशी रूपे घेऊन तिच्याकडे दांपत्य म्हणून भोजनास जावे. ती तुमचे पूजन करील, तुम्हास धन देईल.।।१५।। ते तुम्ही जाऊन घेऊन या; मग मी पण तुम्हास तुमच्या मनासारखे भरपूर धन देईन. हे पाहा माता, पिता, गुरू आणि राजा ह्यांची आज्ञा कधी मोडू नये हे तर तुम्ही जाणताच. ।।१६।। त्यावर ते दोघे राजास म्हणाले, “राजा, आज्ञापालन हा जरी धर्म असला तरी हे निंद्य कर्म आहे, आम्ही हे कर्म कसे करावे? शास्त्राने तर असे सांगितले आहे की, स्त्रीवेषातील पुरुषास पाहिले तर सचैल स्नान करावे तरच शुद्धी होते.”।।१७॥

पुरुषासी नारीवेष देखतां ॥ पाहणार जाती अधःपाता ॥ वेष घेणारही तत्त्वतां ।। जन्मोजन्मीं स्त्री होय ॥१८॥ हेंही परत्रीं कर्म अनुचित ।। तैसेंचि शास्त्र बोलत ।। त्याहीवरी आम्ही विद्यावंत ॥ धन अमित मेळवू ॥१९॥ आमुची विद्यालक्ष्मी सतेज ॥ तोषवू अवनीचे भूभुज ।। आमुचे नमूनि चरणांबुज ॥ धन देती प्रार्थनियां ॥२०॥ पंडितांचि विद्या माय सद्गुणी ॥ विद्या अकाळीं फळदायिनी ॥ विद्या कामधेनु सांडूनी ॥ निंद्य कर्म न करूं कदा ॥ २१ ॥ मातापित्यांहूनि विद्या आगळी ।। संकटीं प्रवासीं प्रतिपाळी ॥ पृथ्वीचे प्रभु सकळी ॥ देखोनियां जोडिती कर ॥ २२ ॥ विद्याहीन तो पाषाण देख ॥ जिताची मृत तो शतमूर्ख ।। त्याचें न पाहावें मुख ॥ जननी व्यर्थ श्रमविली ॥२३॥ राव म्हणे दोघांलागून ।। माझें मान्य करावें एवढें वचन ॥ परम संकट पडलें म्हणून ॥ अवश्य म्हणती तेधवां ॥ २४ ॥ रायें वस्त्रे अलंकार आणून ॥ एकासी स्त्रीवेष देऊन ॥ सोमवारीं यामिनीमाजी जाण ॥ पूजासमयीं पातलें ॥२५॥ जे सकळ प्रमदांची ईश्वरी। जिची प्रतिमा नाहीं कुंभिनीवरी ।। जीस देखोनि नृत्य करी ॥ पंचशर प्रीतीनें ॥२६॥

पुरुषाला स्त्रीच्या वेषात पाहिले तर पाहणारा अधःपतनास जातो. जो स्त्री वेष धारण करतो तो जन्मोजन्मी स्त्री होतो. ।।१८।। हे राजा, हे निंद्य कर्म आहे. ते करण्यापेक्षा आम्ही आमच्या ज्ञानाच्या, विद्येच्या बळावर धन संपादन करू. ।।१९।। आमची विद्यालक्ष्मी आम्हास साथ देईल, भूलोकीचे. विधेस मान देणारे भूपाल आमची विद्या, ज्ञान, कला पाहून आमचा आदर करतील. आम्हास त्यांचेकडून धन मिळेल. ||२०|| विद्या ही मातास्वरूप असते. ती फलप्राप्ती करून देते, ती मानसन्मान मिळवून देते. अशी विद्या आमच्याकडे असताना आम्ही हे असले निंद्य कर्म का करावे? ।।२१।। राजा, विद्या ही मातापित्याहून निराळी असून, ती संकटात आपला सांभाळ करते, जे राजे विद्येचे मोल जाणतात ते ज्ञानवंतांसमोर हात जोडतात, त्यास वंदन करतात. ।।२२॥ ज्यास विद्या नाही, ज्ञान नाही तो पाषाणवत मानावा. असा अज्ञानी मूर्ख हा जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. अशाचे तोंडही पाहू नये. त्याचा जन्म म्हणजे केवळ त्या मातेस दुःखच होय. ।।२३।। तरीही राजाने मात्र आपल्या त्या अटीचा आग्रह धरल्याने त्या मुलांचा नाईलाज झाला. शेवटी त्यांना त्या अटीस मान्यता द्यावी लागली. ||२४|| तेव्हा राजाने त्यांना वस्त्रालंकार पुरविले. एक पुरुष झाला, तर दुसरा स्त्री झाला आणि राजाने त्यांना सीमंतिनीकडे सोमवार व्रताच्या निमित्ताने पाठविले. ।।२५।। जी सुंदर स्त्रियांची स्वामिनी, जी लावण्याची खाण, जिच्यासारखी अन्य सुंदर अशी स्त्री पृथ्वीवर कोणी नाही. तिला पाहून मदनही आनंदाने नृत्य करतो. ।।२६।।

रंभा उर्वशी चातुर्यखाणी ।। परी लज्जा पावती जीस देखोनि ।। रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी ।। उपमा शोभे जियेसी ।। २७ ।। तिणें हें दांपत्य देखोनी ।। कृत्रिम पाहूनि हांसे मनीं ।। परी भावार्थ धरूनि चातुर्यखाणी ।। हरभवानी म्हणोनि पूजित ।। २८ ।। अलंकार वस्त्रं यथेष्ट धन ।। षड्रस अन्न देत भोजन ।। शिवगौरी म्हणोन ।। नमस्कार करूनि बोळवी ॥ २९ ॥ जातां ग्रामपंथ लक्षूनी ॥ पुढे भ्रतार मार्गे कामिनी ।। नाना विकार चेष्टा भाषणीं ।॥ बहुत बोले तयासी ॥ ३० ॥ म्हणे आहे हें एकांतवन । वृक्ष लागले निबिड सघन ।। मी कामानळेंकरून ॥ गेलें आहाळून प्राणपति ॥ ३१ ॥ तूं वर्षोनि सुरतमेघ ।। शीतळ करीं ममांग ।।॥ मी नितंबिनी झालें अभंग ।। जवळी पाहें येऊनियां ॥ ३२ ॥ तो म्हणे कां चेष्टा करिसी विशेष ।। फेडीं वस्त्र होय पुरुष ।। विनोद करिसी आसमास ।। हांसती लोक मार्गांचे ॥३३॥ तंव ते कामें होवोनि मूच्छित ।। मेदिनीवरी अंग टाकीत ।। म्हणे प्राणनाथा धांव त्वरित ।। करीं शांत कामज्वरातें ।। ३४ ।। तंव तो परतोनि आला सवेग ॥ म्हणे हें नसतें काय मांडिलें सोंग ।। तुम्ही आम्ही गुरुबंधू निःसंग ।। ब्रह्मचारी विद्यार्थी ॥३५॥

जी चातुर्याची खाण आहे, जी रंभा-उर्वशीपेक्षाही अधिक सुंदर आहे; जिला रेणुका, सीता किंवा सुभद्रा ह्यांचीच उपमा देता येते. ।।२७।। त्या सीमंतिनीने ह्या शिवव्रताच्या वेळी आलेल्या नाटकी दांपत्यास खरेतर मनोमन ओळखले. तरीही ते खरेच पती-पत्नी म्हणजेच शिव-पार्वती आहेत असे मानून तिने त्यांचे पूजन केले. ||२८|| तिने त्यांचे पूजन करून त्यांना वस्त्रालंकार देऊन मिष्ठान्नाचे भोजन देऊन त्यांनी बोळवण केली. ||२९|| ते दोघे तिकडून आपल्या नगराकडे परत येत असताना वाटेने त्यांच्या पती-पत्नी सारख्या गप्पागोष्टी, खाणाखुणा, हास्यविनोद चालले होते. ||३०|| तेव्हा एका एकांतस्थळी त्यांच्यातील पत्नी ही पतीस म्हणू लागली, “हे प्राणेश्वरा, मी कामाग्नी पोळले आहे, इथे एकांतही आहे तेव्हा, ।।३१।। तू माझी कामना पूर्ण कर, हे बघ मी खरोखरच स्त्री आहे, माझे सारे अवयव हे स्त्रीचे झाले आहेत. जवळ ये आणि हवी तर खात्री करून घे.”।।३२।। तेव्हा तो पती रूपातला मित्र त्यास म्हणाला, “अरे काय ही अशी चेष्टा करतोस? तू नाटकी स्त्री आहेस, तू पुरुषच आहेस. हे असे वागू नकोस. लोक आपल्याला हसतील. “।॥३३॥ तेव्हा ज्याने स्त्री रूप धारण केले होते तो प्रत्यक्ष स्त्रीच झाल्याने तो इतका कामविवश झाला होता की, त्यानें धरणीवर अंग टाकले आणि आपला कामज्वर शांत करण्याची दुसऱ्यास विनवणी करू लागला. ।।३४।। तेव्हा तो पती झालेला मित्र त्यास म्हणाला, तू हे काय सोंग मांडले आहेस. अरे आपण दोघेही गुरुबंधू आहोत, मित्र आहोत, पुरुष आहोत, आपण ब्रह्मचारी आहोत आणि हा असला कसला तुझा हट्ट। || ३५ ||

येरी म्हणे बोलसी काये ॥ माझे अवयव चांचपोनि पाहें ॥ गेलें पुरुषत्व लवलाहें ।। भोगीं येथें मज आतां ।। ३६ ।। हातीं धरूनि तयासी ।। आडमार्गे नेलें एकांतासी ।। वृक्ष गेले गगनासी ।। पल्लव भूमीसी पसरले ।। ३७ ।। साल तमाल देवदार ।। आम्र कदंबादि तरुवर ।। त्या वनीं नेऊनि सत्वर ।॥ म्हणे शंका सांडीं सर्वही ॥ ३८ ॥ मी स्त्री तूं भ्रतार निर्धार ।। नाहीं येथें दुसरा विचार ।। येरू म्हणे हें न घडे साचार ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधु ॥३९॥ शास्त्र पढलासी सकळ । त्याचें काय हेंचि फळ ।। परत्रसाधन सुकृत निर्मळ ।। विचार करूनि पाहें पां ॥४०॥ आधींच स्त्री वरी तारुण्य ।। परम निर्लज्ज एकांतवन ।। मिठी घाली गळां धांवून ।। देत चुंबन बळेंचि ॥४१॥ घेऊनियां त्याचा हात ॥ म्हणे पाहें हे पयोधर कमंडलुवत ।। तंव तो झिडकारूनि मागें सारीत ।। नसता अनर्थ करूं नको ॥ ४२ ॥ धन्य धन्य ते पुरुष जनीं ।। परयोषिता एकांतवनीं ।। सभाग्य सधन तरुणी ॥ प्रार्थितां मन चळेना ॥४३॥ वृत्तीस नव्हे विकार ।। तरी तो नर केवळ शंकर ।। त्यापाशीं तीर्थं समग्र । येवोनि राहती सेवेसी ॥४४॥

तेव्हा तो स्त्री झालेला मित्र दुसऱ्यास म्हणाला, “अरे हवी तर खात्री कर. मी खरोखरच स्त्री झालो आहे. माझे पुरुषत्व मी गमावले आहे. आता विलंब न करता इथेच भोगसुख घे आणि मलाही ते दे.” ।।३६।। असे म्हणत त्या स्त्रीने पुरुष मित्रास एकांतस्थानी नेले. तिथले वृक्ष पार गगनाला जाऊन मिडले होते. तिथे गार सावली आणि कृष्णछाया पसरली होती. ||३७|| तिथे साल, तमाल, देवदार, आम्म्र, कदंब यासारखे मोठे वृक्ष होते. त्या झाडीत नेऊन ती स्त्री पुरुषास म्हणाली, “बघ बघ नीट माझ्याकडे, पाहून खात्री करून घे. ।। ३८ ।। आता हेच सत्य आहे की, मी तुझी पत्नी आहे आणि तू माझा पती. तेव्हा अन्य सर्व विचार दूर सारून टाक.” त्यावर तो पुरुष मित्र म्हणाला, “काय हे अरे आपण तर दोघे गुरुबंधू आहोत. ।। ३९ ।। तू माझ्याच बरोबर शास्त्राध्ययन केलेले आहेस. तुला कोणत्या कर्माची कोणती फळे मिळतात हे ज्ञात आहे. पापाचरण हे परलोकीचे साधन नाही हे लक्षात घे. अरे असे करू नकोस. नीट विचार कर.”।।४० ।। पण ती स्त्री इतकी कामविवश झाली होती की, तिने निर्लज्जपणे पुढे येऊन त्या पुरुषास मिठी घातली, ती त्याचे चुंबन घेऊ लागली. ।।४१।। त्याचा हात बळजबरीने आपल्या छातीशी नेत ती म्हणाली, “बघ माझे स्तन कसे कमंडलूसारखे पुष्ट झाले आहेत”. तेव्हा रागाने त्या पुरुषाने तिला झिडकारले आणि तो म्हणाला, “छे असा अनर्थ करू नकोस.” ।।४२।। खरोखरच तो पुरुष धन्य, संयमी म्हणायला हवा की, जो एका एकांत स्थळी एका स्त्रीने आपणहून ती मागणी केली असतानाही स्वतःच्या मनास विवेकाचा आवर घालू शकला. ।।४३।। वृत्तींना विकारात बदलू देत नाही तो साक्षात शिवच मानायला हवा. त्याच्या चरणाशी सर्व पवित्र तीर्थे एकत्र येऊन राहतात. ।।४४।।

जनरहित घोर वनीं ।। द्रव्यघट देखिला नयनीं ।। देखतां जाय ओसंडोनी ।। तरी तो शंकर निर्धार ॥४५॥ सत्यवचनीं सत्कर्मी रत ॥ निगमागमविद्या मुखोद्गत ।। इतुकें असोनि गर्वरहित ॥ तरी तो शंकर निर्धारं ॥४६॥ आपणां देखतां वर्म काढूनी ॥ निंदक विंधिती वाग्बाणीं ॥ परी खेदरहित आनंद मनीं ।। तरी तो शंकर निर्धारं ॥ ४७ ॥ दुसरियाचे कूटदोषगुण ।। देखे ऐके जरी अनुदिन ।। परी ते मुखास नाणी गेलिया प्राण ॥ तरी तो शंकर निर्धारं ॥ ४८ ॥ न दिसे स्त्रीपुरुषभान ॥ गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण ।। न सांगे आपुलें सुकृत तप दान ।॥ तरी तो शंकर निर्धारं ॥ ४९ ॥ पैल मूर्ख हा पंडित ॥ निवडूं नेणे समान पाहत । कीर्ति वाढवावी नावडे मनांत ॥ तरी तो शंकर निर्धारं ॥५०॥ अभ्यासिलें न मिरवी लोकांत ।। शिष्य करावे हा नाहींच हेत ॥ कोणाचा संग नावडे आवडे एकांत ॥ तरी तो शंकर निर्धारं ॥५१॥ विरोनि गेल्या चित्तवृत्ती ।। समाधी अखंड गेली भ्रांती ॥ अर्थ बुडालियाची नाहीं खंती ।॥ तरी तो शंकर निर्धारें ॥ ५२ ॥ श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ॥ ते ब्रह्मानंद परमहंस ॥ त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष ॥ होऊनि राहावें सर्वदा ॥५३॥

एखाद्या निर्मनुष्य स्थानी सापडलेला द्रव्याचा घटही स्वार्थाने उचलून घ्यावा असा लोभ, मोह ज्याच्या मनास येत नाही तो विरक्त शंकरच म्हणायला हवा. ।।४५।। जो सत्कर्मात रममाण आहे, जो गर्वरहित आहे, ज्याला निगमागम मुखोद्गत आहेत तो धन्य समजावा, त्यास प्रती शंकरच मानावे. ।॥४६॥ जो इतरांच्या शब्दबाणांनी घायाळ होत असतानाही शांत राहतो, ज्याला त्याबद्दल कसलाही खेद वाटत नाही तो साक्षात शिव मानावा. ॥४७॥ जो इतरांचे गुणदोष हे त्यास पुरतेपणाने ज्ञात असतानाही ते कदापि बोलून दाखवत नाही तो शंकरच जाणावा. ।।४८|| ज्याच्या मनात स्त्री-पुरुष हा भेद नाही, जो सर्व चराचरात गुरुरूप पाहतो; जो आपल्या पुण्याची, दानाची, सत्कर्माची कुठेही वाच्यता करीत नाही तो शिव शंकरच मानावा. ।॥५०॥ जो आपल्या ज्ञानाभ्यासाचा टेंभा मिरवित नाही, जो मुद्दाम कोणास आपले शिष्य करत नाही, जो अनेकांच्या संगात न रमता एकांतात असतो, तो शिवरूपच मानावा. ।।५१।। ज्याच्या मनातील वृत्तींची निवृत्ती झाली आहे, जो नित्य स्वानंदाच्या समाधी सुखात बुडालेला आहे, जो त्याचे सर्वस्व बुडाले असतानाही शांत, स्थिर आणि अचल आहे तो साक्षात शिवच मानावा. ॥५२॥ श्रीधर कवी इथे असे म्हणतात की, असा पुरुष हा ब्रह्मानंदात रमणारा परमहंस असतो. आपण त्याच्या पायातील पादुका होऊनच राहावे. ।।५३।|

वेदमित्रपुत्र साधु परम ।। धैर्यशस्त्रे निवटोनि काम ।। म्हणे ग्रामास चला जाऊं उत्तम ।। विचार करूं या गोष्टीचा ॥५४॥ ऐसें बोलोनि सारस्वतपुत्र ।। स्त्रीरूपें सदना आणिला सत्वर ।। श्रुत केला समाचार ।। गतकथार्थ वर्तला जो ॥ ५५ ॥ सारस्वतें मांडिला अनर्थ ॥ रायाजवळी आला वक्षःस्थळ बडवीत ।। म्हणे दुर्जना तुवां केला घात ।। हत्या करीन तुजवरी ॥ ५६ ॥ वेदशास्त्रसंपन्न ।। येवढाच पुत्र मजलागून ।। अरे तुवां निर्वंश केला पूर्ण ॥ काळें वदन झालें तुझें ॥५७॥ विदर्भ अधोगतमुख पाहात ।। म्हणे कृत्रिम केवीं झालें सत्य ।। शिवमाया परम अद्भुत ॥ अघटित कर्तृत्व तियेचें ॥५८॥ रायें मेळवूनि सर्व ब्राह्मण ।। म्हणे सतेज करा अनुष्ठान ।। द्यावें यासि पुरुषत्व आणून ।। तरीच धन्य होईन मी ॥५९॥ विप्र म्हणती हे ईश्वरी कळा ।। आमुचेनि न पालटे भूपाळा ।। तेव्हां विदर्भराव तये वेळां ।। आराधित झाला देवीतें ॥ ६० ॥ हवन मांडिलें दुर्धर ।। राव सप्तदिन निराहार ।। देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर मग बोले विदर्भ तो ॥ ६१ ॥

त्या वेदमित्राचा मुलगा हा असाच संयमी, कामरहित, विवेकी, विचारी असा होता. म्हणूनच त्याने त्याही परिस्थितीत आपल्या मनावर ताबा ठेवला आणि आपल्या त्या स्त्री झालेल्या मित्रास चल आपण प्रथम आपल्या गावी जाऊ या, असे म्हणून मोठ्या प्रयत्नांनी सोबत घेऊन आला. ।।५४।। वेदमित्राच्या मुलाने सोमवंतास घरी आणले आणि त्याने घरच्या लोकांना झालेला सर्व वृत्तांत निवेदन केला. ।।५५।। ते ऐकून सारस्वत ब्राह्मणाने एकच आकांत मांडला. तो ऊर बडवून घेत राजाने माझ्या मुलाचा घात केला असे ओरडत राजाकडे गेला. तो राजास म्हणू लागला. तू माझा घात केलास. मला आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहेस. ।।५६।। राजा, अरे तुझ्या त्या अटीमुळे माझा विद्यावंत, गुणवंत एकुलता एक पोर तू नासवलास. माझा वंश तू निर्वंश केलास. तू माझे तोंड काळे केलेस. ।॥५७॥ तेव्हा तो सारा समाचार ऐकून राजा मनोमन विचार करू लागला की, खरंतर तो एक नाटकी खेळ असताना तो असा खरा कसा झाला हे सारे अद्भुत असे त्या एका शिवाच्या मायेनेच तर घडले नसेल ना? ।।५८।। तेव्हा राजाने नगरीच्या विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांना सांगितले की, काय हवी ती अनुष्ठाने करा, दैवी उपाय करा; पण या मुलास त्याचे गेलेले पौरुषत्व परत आणून द्या. ।।५९।। तेव्हा आपली असमर्थता व्यक्त करीत ती ब्राह्मण मंडळी राजास म्हणाली, महाराज, क्षमा असावी; पण या ईश्वरी सत्तेपुढे आमचे काहीच चालत नाही. तेव्हा त्या राजाने शेवटी आपल्या कुलदेवतेची, देवीची आराधना करंण्यास प्रारंभ केला. ।। ६० ।। राजाने सात दिवस निराहार राहून देवी प्रसन्न व्हावी म्हणून हवन कार्य केले. मनःपूर्वक देवीची उपासना केली. तेव्हा देवी राजावर प्रसन्न झाली. त्यास दर्शन देऊन ‘वर माग’ असे म्हणाली. ।।६१।।

म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष ।। यासी पुनः करीं पुरुष ।। देवी म्हणे ही गोष्ट निःशेष ॥ न घडे सहसा कालत्रयीं ।। ६२ ।। निःसीम पतिव्रता सीमंतिनी ।। परम भक्त सद्गुणखाणी ।। तिचें कर्तृत्व माझेनी ।। न मोडवे सहसाही ।॥६३॥ या सारस्वतासी दिव्य नंदन ॥ होईल सत्य वेदपरायण ।। ईस सुमेधा वर जाण ।। लग्न करूनि देईजे ॥६४॥ देवीच्या आज्ञेवरून । त्यासींच दिधलें लग्न करून ।। अंबिकेचे वचनें जाण ।। पुत्र जाहला सारस्वता ॥ ६५ ॥ धन्य सीमंतिनीची शिवभक्ती ।। उपमा नाहीं त्रिजगतीं ।। जिचें कर्तृत्व हैमवती ।। मोडूं न शके सर्वथा ॥ ६६ ॥ सूत म्हणे ऐका सावधान ॥ अवंती नगरीं एक ब्राह्मण ।। अत्यंत विषयी नाम मदन ॥ शृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥ ६७ ॥ पिंगलानामें वेश्या विख्यात ।। तिसीं झाला सदा रत ॥ सांडूनि ब्रह्मकर्म समस्त ।। मातापिता त्यागिलीं ॥६८॥ धर्मपत्नी टाकूनि दुराचारी ।। तिच्याच घरीं वास करी ।। मद्यमांसरत अहोरात्रीं ।। कामकर्दमीं लोळत ॥६९॥ करावया जगदुद्धार ।। आपणचि अवतरला शंकर ।। ऋषभनामें योगीश्वर ।। होवोनि विचरत महीवरी ||७०।।

तेव्हा राजाने देवीस त्या सोमवंतास पुन्हा पुरुषत्व देण्याची विनंती केली. तेव्हा देवी राजास समजावीत म्हणाली, “हे राजा, हे असे कदापि होणे शक्य नाही. ।।६२।। हे राजन, अरे हा सारा त्या पतिव्रता आणि शिवोपासक सीमंतिनीच्या उपासनेचा पुण्यप्रभाव आहे. हे तिच्या तपोबलानेच घडले आहे, ते मलासुद्धा बदलता येणार नाही.”।।६३।। राजा, मी फक्त हेच सांगू शकते की, ह्या स्त्री झालेल्या विप्र कुमारास पुढे एक अत्यंत गुणवंत, विद्यावंत असा पुत्र होईल. यास्तव आपण सर्वांनी या शिवइच्छेचा स्वीकार करीत या दोघांचं लग्न लावून द्यावे हेच उचित ठरेल. ।।६४।। अखेर सर्वांचाच नाइलाज झाला. सर्वांनाच ते सत्य स्वीकारावे लागले. अंती त्या दोघांचा विवाह करून देण्यात आला. कालांतराने देवीच्या अभिवचनाप्रमाणे त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. ।।६५।। खरोखर ती सीमंतिनी धन्य होय की, जिची करणी साक्षात राजाची कुलदेवता हेमवती देवीही बदलू शकली नाही.।।६६।। सूत श्रोत्यांना पुढे असे सांगतात की, सुजनहो, आता एका नव्या कथाश्रवणास सादर व्हा. अवंती नावाच्या नगरात एक मदन नावाचा ब्राह्मण राहात होता. तो अतिशय विषयासक्त आणि कामांध होता. त्यास शृंगार आणि सुगंध ह्यांचे विलक्षण वेड होते. ।।६७॥ त्याच नगरीत एक पिंगला नावाची वेश्या राहात होती, हा मदन ब्राह्मण तिच्याच जास्त संपर्कात होता. त्याने आपले सर्व ब्राह्मणत्व बाजूस सारून, प्रत्यक्ष आपल्या माता-पित्यांचाही त्याग करून तिच्याशी संग साधला होता. ।।६८ ।। त्या दुराचारी विप्राने स्वतःच्या धर्मपत्नीचा त्याग करून तो या पिंगलेकडे जास्त राहात होता. मद्य, मांस आणि विषयभोग असे नाना भोग उपभोगत होता. ।।६९।। दीन, पतित आणि अन्नानी लोकांच्या उद्धारासाठी जगात भगवान शिव हे वारंवार अवतार धारण करत असतात. एकदा असाच एक थोर ऋषभ नावाचा एक शिवयोगी पृथ्वीवर संचार करीत होता. ।।७०।।

आपुले जे जे निर्वाणभक्त ॥ त्यांचीं दुःखें संकटें निवारीत ॥ पिंगलेच्या सदना अकस्मात ।। पूर्वपुण्यास्तव पातला ॥ ७१ ॥ तो शिवयोगींद्र दृष्टीं देखोन ॥ दोघेही धांवती धरिती चरण ॥ षोडशोपचारेंकरून ।। सप्रेम होऊन पूजिती ॥ ७२ ॥ शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध ।। चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद । भोजन देऊनि बहुविध ॥ अलंकार वस्त्रे दीधलीं ॥ ७३ ॥ करूनियां दिव्य शेज ।। निजविला तो शिवयोगीराज ॥ तळहातें मर्दिती दोघे चरणांबुज ॥ सुपर्णाग्रजउदय होय तों ॥७४॥ एक निशी क्रमोनि जाण ॥ शिवयोगी पावला अंतर्धान ।। दोघे म्हणती उमारमण ॥ देऊनि दर्शन गेला आम्हां ।॥७५॥ मग पिंगला आणि मदन ॥ कालांतरीं पावलीं मरण । परी गांठीस होतें पूर्वपुण्य ॥ शिवयोगी पूजनाचें ।॥ ७६ ॥ दाशार्हदेशींचा नृपती ।। वज्रबाहुनामें विशेषकीर्ती ।। त्याची पट्टराणी नामें सुमती ।। जेवीं दमयंती नळाची ॥ ७७ ॥ तो मदननामें ब्राह्मण ॥ तिच्या गर्भी राहिला जाऊन ॥ सीमंतिनीच्या पोटीं कन्यारत्न ।। पिंगला वेश्या जन्मली ॥७८॥

तो आपल्या निज भक्तांची संकटे, दुःखे निवारण करीत असे. त्या नगरीतील पिंगलेचीही गतजन्माची काहीतरी पुण्याई म्हणून की काय तो तिच्या घरी आला. ।।७१|| तो शिवयोगी दारी येताच मदन आणि ती पिंगला वेश्या हे दोघे त्या शिवयोग्यास सामोरे गेले. त्यांनी त्या योग्याचे शरणागत भावाने चरण धरले. मोठ्या आदराने व सन्मानाने त्यास आपल्या घरात आणले, त्याचे पाद्यपूजन केले. ||७२ || तसेच त्यास वस्त्रालंकार आणि अत्यंत उत्तम अशाप्रकारचे कोरडे तळलेले, भाजलेले, शिजवलेले असे नाना पदार्थ त्यांनी त्या योग्यास भोनात देऊ केले. त्यास संतुष्ट करून वर विडाही दिला. ।।७३।। नंतर त्यांनी त्या योग्यास एका मंचकावर पहुडण्यास सांगून ते दोघेही त्या शिवयोग्याचे चरण चुरू लागले. ||७४ || त्यांनी त्या रात्री त्या शिवयोग्याची तशी सेवा केली आणि पहाटेच्या सूर्योदयाबरोबर तो शिवयोगी गुप्त झाला. तेव्हा त्या दोघांना प्रत्यक्ष भगवान शिवानेच आपल्याला त्या योग्याच्या रूपात दर्शन दिले आणि आपली सेवा स्वीकारली असे वाटू लागले. ।। ७५|| असाच काही काळ गेला आणि ते दोघेही मरण पावले; परंतु त्यांच्या पदरी हे शिवयोगी पूजा आणि सेवेची पुण्याई होती. ।। ७६।। दाशार्ह देशीचा राजा वज्रबाहू आणि त्याची राणी सुमती ह्या दोघांचा जोडा हा अगदी नल-दमयंती सारखा होता. ।। ७७॥ पूर्वपुण्याईच्या बळावर तो मदन ब्राह्मण हा त्या राणी सुमतीच्या पोटी जन्मास आला. तर पिंगलेने सीमंतिनीच्या घरी तिच्या कन्येच्या कीर्तीमालिनीच्या रूपाने जन्म घेतला. ।।७८।।

कीर्तिमालिनी तिचें नांव ।। पुढें कथा ऐका अभिनव ।। इकडे सुमतीचे पोटीं भूदेव ।। असतां विचित्र वर्तलें ।॥ ७९ ॥ तिच्या सवती होत्या अपार ॥ ही पट्टराणी ईस होईल पुत्र ।। त्यांहीं तीस विष दुर्धर ।। गर्भिणी असतां घातलें ॥८०॥ तीस तत्काळ व्हावा मृत्य ॥ परी रोग लागला झाली प्रसूत ।। विष अंगावरी फुटलें बहुत ।। बाळकासहित जननीच्या ।।८१ ।। क्षतें पडलीं झाले व्रण ।। रक्त-पू गळे रात्रंदिन ॥ रायें बहुत वैद्य आणून ॥ औषधं देतां बरें नोहे ॥८२॥ रात्रंदिवस रडे बाळ ॥ सुमती राणी शोकें विव्हळ ॥ मृत्यूही नोहे व्यथा सबळ ।। बरी नव्हेचि सर्वथा ॥८३॥ लेकरूं सदा करी रुदन ।। रायासी निद्रा न लागे रात्रंदिन ।। कंटाळला मग रथावरी घालून ।। घोर काननीं सोडिलीं ॥८४॥ जेथे मनुष्याचें नाहीं दर्शन ।। वसती व्याघ्र सर्प दारुण ।। सुमती बाळ कडे घेऊन ॥ सव्य अपसव्य हिंडतसे ॥८५॥ कंटक पाषाण रुतती चरणीं ।॥ मूर्च्छा येऊनि पडे धरणीं ।॥ आक्रंदे रडे परी न मिळे पाणी ।। व्रणेंकरूनि अंग तिडके।। ८६ ॥ म्हणे जगदात्मा कैलासपती ।। जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ती ॥ भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ति ।। सदा गाती निगमागम ।।८७ ॥

तो मदन ब्राह्मण हा सुमतीच्या पोटी वाढत असताना एक दिवस एक विचित्र घटना घडली.।।७९।। या सुमतीस अनेक सवती होत्या. सुमतीस पुत्र झाला तर ती राजाची अधिकच लाडकी होईल म्हणून सूडाच्या भावनेने सुमती गर्भवती असतानाच तिच्या एका सवतीने तिच्यावर विषप्रयोग केला. ।।८० ।। वास्तविक त्या विषप्रयोगाने ती तत्काळ मरेल अशी अपेक्षा होती. पण तसे न घडता ते विष तिच्या शरीरात भिनले, तिला असाध्य अशी व्याधी जडली. त्यातचती प्रसूत ही झाली आणि ती व तिच्या बाळाच्या अंगार ते पोटातले विष फुटले. ।।८१।। त्या मायलेकराच्या अंगावर अनेक शते पडून त्यातून रक्त, पू गळत असे. राजाने खरेतर त्यावर अनेक औषधोपचार केले; पण दोघांनाही आरोग्यता लाभत नव्हती. ||८२|| त्या रोगपीडेने बाळ सारखा रडत असे, सुमतीसही फार वेदना होत होत्या. तिला ते सारे असह्य होत होते, यापेक्षा मरण आलेले चांगले असे तिला वाटे. ।।८३।। मुलाच्या रात्रंदिवस रडण्याने राजासही शांत झोप येत नव्हती, तो पण या सगळ्या त्रासाला पार कंटाळला होता. एक दिवस त्याने त्या दोघाही मायलेकरांना दूर नेऊन रानावनात सोडून दिले. ।।८४|| त्या निर्मनुष्य अशा वनात अनेक हिंस्र पशू, अनेक विषारी भयानक साप इतस्ततः फिरत होते. बिचारी निराधार झालेली सुमती आपल्या लेकराला कडेवर घेऊन त्या वनात आसरा शोधीत होती. ।।८५।। तिच्या पायात काटे रुतत होते. दगड धोंडे पायाला लागत होते, खडे रुतत होते. ती तहानलेल्या अवस्थेत पाण्याच्या शोधात पाय नेतील तिकडे फिरत होती. ।। ८६ ।। ती भगवान शिवाचा आठव करून त्यास म्हणत होती की, हे देवा महादेवा, मी तर असे ऐकले होते की, तू आपल्या निज भक्तांचा सांभाळ करतोस. ।।८७॥

जय जय त्रिदोषशमना त्रिनेत्रा ।। जगदंकुरकंदा पंचवक्त्रा ।। अज अजिता पयः फेनगात्रा ।। जन्मयात्रा चुकवीं कां ॥८८॥ अनादिसिद्धा अपरिमिता ॥ मायाचक्रचालका सद्‌गुणभरिता ।। विश्वव्यापका गुणातीता ।। धांव आतां जगद्‌गुरो ॥८९॥ ऐसा धांवा करितां सुमती ।। तंव वनीं सिंह व्याघ्र गर्जती ।। परम भयभीत होऊनि चित्तीं ।॥ बाळासहित क्षितीं पडे ॥ ९० ॥ श्रावणारितनयें नेऊन ।। वनीं सांडिलें उर्वीगर्भरत्न ।। कीं वीरसेनस्नुषा घोर कानन ।। पतिवियोगें सेवी जैसें ।॥ ९१ ॥ सुमतीची करुणा ऐकून ॥ पशु पक्षी करिती रुदन ।। धरणीं पडतां मूर्च्छा येऊन ॥ वृक्ष पक्षी छाया करिताती ॥९२ ।। चंचू भरुनियां जळ ॥ बाळावरी शिंपिती वेळोवेळ ।॥ एकीं मधुर रस आणोनि स्नेहाळ ।। मुखीं घालोनि तोषविती ॥९३॥ वनगायी स्वपुच्छेंकरूनी ।। वारा घालिती रक्षिती रजनीं ।। असो यावरी ते राजपत्नी ।। हिंडतां अपूर्व वर्तलें ॥९४॥ तों वृषभभार वणिक घेवोनि ॥ पंथें जातां देखे नयनीं ।॥ त्याचिया संगेंकरूनी ॥ वैश्यनगरा पातली ॥ ९५ ॥ तेथील अधिपती वैश्य साचार ।। त्याचें नांव पद्माकर ।। परम सभाग्य उदार ॥ रक्षक नाना वस्तूंचा ॥९६॥

हे त्रिनेत्रा, हे त्रितापहारका, हे पंचवदना, तुझा जयजयकार असो. हे देवा, माझ्यावर कृपा कर आणि माझा हा सारा ताप दूर कर. माझी ही दुःखित जन्मयात्रा चुकव. ।।८८|| तू आदि अनादि सिद्ध आहेस, तू अतुलनीय आहेस, तू मायाचक्राचे भेद करणारा, सर्व ताप दूर करणारा, विश्वव्यापी आहेस, तू दीनांचा कैवारी आहेस. तेव्हा हे सदाशिवा, माझ्या हाकेस धावून ये. आमचे रक्षण कर. ।।८९।। एकीकडे सुमती देवाचा असा धावा करीत होती, तर दुसरीकडे वनातल्या वाघ सिंहाच्या भयानक डरकाळ्या ऐकून ती आणि तिचे बाळ हे भयभीत होत होते. ।।९०|| ज्याप्रमाणे रामांनी जानकी मातेस वनात सोडून दिल्यावर ती जसे दुःखकष्ट भोगत होती, तशी आता सुमतीचीही अवस्था झाली होती. ती त्याचा दुःखानुभव घेत होती. ।।९१।। त्या सुमतीचे ते दुःखकष्ट पाहून पशुपक्षीही दुःखित होत होते. ते वारंवार तिला असह्य यातनांनी धरणीवर कोसळताना पाहून रडत होते. दया आणि करुणेपोटी वृक्ष तिच्यावर मायेची सावली धरीत होते. ||९२|| पक्षी आपल्या चोचीत पाणी भरून आणीत आणि त्याचा शिडकावा बाळाच्या अंगावर करून त्यास सुखवीत होते. तरकाही पक्षी हे मधुर असा रस आणून तो त्या बाळास पाजीत होते. ।९३।। रानगायी या दमलेल्या थकलेल्या मायलेकरांना आपल्या शेपटीने वारा घालीत. त्यांची काळजी घेत. अशा परिस्थितीत ती राणी वनात फिरत असताना तिने एक दृश्य पाहिले. ।।९४।। तिने आपल्या बैलांचा कळप घेऊन जाणारा एक वाणी पाहिला. त्याच्यामागोमाग वाट चालत चालत ती एका नगरीत येऊन पोहोचली. त्या नगरीचे नाव नाव होते वैश्यनगरी. ।।९५।। त्या नगरीत पद्माकर नावाचा एक सहृदयी असा वैश्य प्रमुख अधिकारी होता. तो अत्यंत उदार आणि कनवाळू होता. ।।९६।।

तेणें सुमतीस वर्तमान ।। पुसिलें तूं कोठील कोण ।। जिणें जें वर्तलें मुळींहून ।। श्रुत केलें तयातें ।।९७ ।। तें ऐकूनि पद्माकर ।। त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र ।। श्वासोच्छ्वास टाकूनि घोर ।। म्हणे गति थोर कर्माची ।।९८ ॥ वज्रबाहूची पट्टराणी ॥ पतिव्रता अवनीची स्वामिनी ।। अनाथापरी हिंडे वनीं ॥ दीनवदन आली येथें ।॥ ९९ ॥ मग पद्माकर म्हणे सुमती ।। तूं माझी धर्मकन्या निश्चितीं ।। शेजारीं घर देऊनि अहोरातीं ।। परामर्श करी तियेचा ॥१००॥ बहुत वैद्य आणून ॥ देता झाला रसायन ॥ केले बहुत प्रयत्न ।। परी व्याधी न राहेचि ।। १०१ ।। सुमती म्हणे ताता ॥ श्रीशंकर वैद्य न होतां ।। कवणासही हे व्यथा ।। बरी न होय कल्पांतीं ॥१०२॥ असो पुढें व्यथा होतां कठिण ॥ गेला राजपुत्राचा प्राण ॥ सुमती शोक करी दीनवदन ॥ म्हणे रत्न गेलें माझें ॥१०३॥ पद्माकर शांतवी बहुतां रीतीं ।। नगरजन मिळाले सभोंवतीं ।। तों निशांती उगवला गभस्ती ॥ तेवीं शिवयोगी आला तेथें ॥१०४। ।। जैसें दुर्बळाचें सदन शोधीत ।। चिंतामणि ये अकस्मात ।। कीं क्षुधेनें प्राण जात ।। तों क्षीराब्धि पुढें धांविन्नला ॥१०५॥

त्याची जेव्हा सुमतीशी भेट झाली तेव्हा त्याने तिची मोठ्या आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुमतीने डोळ्यांत पाणी आणून आपली दुर्देवी कर्मकहाणी त्या पद्माकर नावाच्या वैश्यास निवेदन केली. ॥९७॥ तिची ती कर्मकहाणी ऐकून आणि त्या मायलेकरांचे हाल पाहून त्यास अत्यंत वाईट वाटले. तो म्हणाला, “बाई गं, खरंच कर्माची गती फार वेगळी असते.”।। ९८ ।। खरंतर ही राजा वज्रबाहूची पट्टराणी, सकल सौख्याची स्वामिनी, पण आज मात्र ती निराधार होऊन रानी, वनी फिरते आहे, ह्याला केवळ दुर्दैव नाही तर काय म्हणायचे? ।।९९।। त्या पद्माकर वैश्याने सुमती राणीस आपली धर्मकन्या मानले. तिला आपल्या घराशेजारी एक घर दिले आणि तो तिची पित्यासमान काळजी घेऊ लागला. ||१००।। खरंतर त्याने काही निष्णात अशा वैद्यांकडून त्या मायलेकरांवर औषधोपचारही करविले, पण त्यास त्यात काही म्हणावे असे यश आले नाही. ।।१०१|| तेव्हा एक दिवस सुमती म्हणाली, “बाबा, मला तर असे वाटते की, या आमच्या व्याधीवर जर तो भगवान भोलेनाथ हाच वैद्य झाला तर त्याच्याच कृपेने ही व्याधी कदाचित दूर होईल. नाहीतर आम्हास ह्या व्याधी पीडेतच मरण भोगावे लागणार असेच दिसते.” ।।१०२।। एक दिवस सुमतीचे ते बोल खरे झाले. बळावलेल्या रोगाने तिच्या बालकाचा मृत्यू झाला, ती बाळासाठी शोक करू लागली. ||१०३।। दुःखी सुमतीचे पिता पद्माकराने सांत्वन केले. तिथे नगरजनही गोळा झाले. जशी रात्र सरल्यावर सूर्योदय व्हावा तसे अकस्मित तिथे एका शिवयोग्याचे येणे झाले.।।१०४।॥ ज्याप्रमाणे निर्धनाचे हाती चिंतामणी सापडावा किंवा भुकेने प्राण जात असताना क्षीरसागर धावून यावा. ।।१०५।।

पद्माकरें धरिले चरण ।। पूजिला दिव्यासनीं बैसवून ।। त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण ।। शिवयोगी सांगता झाला ॥१०६॥ म्हणे वत्से सुमती ऐक ॥ कां हो रडसी करिसी शोक ॥ तुझें पूर्वजन्मींचे पति पुत्र जनक ॥ कोठें आहेत सांग पां ॥१०७॥ आलीस चौऱ्याऐंशीं लक्ष योनी फिरत ॥ तेथींचे स्वजन सोयरे आप्त ।। आले कोठून गेले कोठें त्वरित ।। सांग मजपाशीं वृत्तांत हा ।।१०८ ।। तूं नाना योनी फिरसी ।। पुढेही किती फेरे घेसी ॥ कोणाचे पुत्र तूं कां रडसी ।। पाहें मानसीं विचारुनी ॥१०९॥ शरीर धरावें ज्या ज्या वर्णां ॥ त्या त्या कुलाभिमानें नाचती प्राणी ॥ परी आपण उत्पन्न कोठूनी ॥ तें विचारूनि न पाहती ॥११० ॥ त्वां पुत्र आणिला कोठून ॥ कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन ।। तूं आणि हे अवघे जन ।। जातील कोठें कवण्या देहा ॥१११॥ आत्मा शिव शाश्वत ।। शरीर क्षणभंगुर नाशवंत ।। तरी तूं शोक करिसी व्यर्थ ।। विचारूनि मनीं पाहें पां ॥ ११२ ॥ आत्मा अविनाशी शाश्वत ।। तो नव्हे कोणाचा बंधु सुत ।। शरीराकारणें शोक करिसी व्यर्थ ॥ तरी पडलें प्रेत तुजपुढें ॥११३॥ जळीं उठती तरंग अपार ।। सवेंचि फुटती क्षणभंगुर ।। मृगजळचि मिथ्या समग्र ।। तरी बुडबुडे सत्य कैसेनि ॥११४॥

तसा तो योनी बेताच पद्माकराने त्याचे स्वागत केले, त्यास आसन दिले व भक्तिभावाने त्याचे पूजन केले. तेव्हा तो शिवयोगी सुमतीचे सांत्वन करीत तिल्ला बोधू लागला. ॥१०६॥तो म्हणाला, हे सुमती, तू का शोक करते आहेस? तुझे पूर्वजन्मीचे आप्तेष्ट कुठे आहेत ते सांग बरं. ।।१०७॥ तू चौऱ्यांशी लदा योनी फिरत फिरत इथवर आलीस, त्या जन्मीचे तुझे आप्प, नातेवाईक, सगेसोयरे हे सारे कोठे गेले? ते सांग पाहू. ॥१०८।। हे सुमती, तू नाना जन्म घेत इथवर आली आहेस आणि पुढेही अनेक जन्म घेणार आहेस. कोणाचा पुत्र आणि तू कोणासाठी शोक करते आहेस ते साक्षीत्वाने तुझ्या मनास विचारून पाहा. ।।१०९।। जीव ज्या कुळात जन्म घेतो त्याचा तो अभिमान बाळगतो; पण मुळात आपण नेमके कुठून आलो आहोत आणि कुठे जायचे आहे ह्याचा जीव विचार करत नाही. ॥११०।। तू हा पुत्र कुठून आणलास? आता तो मरण पावून कोठे गेला? तू आणि हे सर्व लोक पुढे कोणत्या जन्मास जातील, देह धारण करतील. ।।१११।। हे बाळ, आत्मा हा शाश्वत आहे, तर देह हा नश्वर आहे. तेव्हा त्या नश्वर देहासाठी तू का शोक करते आहेस ह्याचा विचार कर. ||११२॥ आत्मा हा शाश्वत आहे, तो कोणाचा मुलगा नाही, कोणाचा भाऊ नाही. जर तू केवळ शरीराचा विचार करत असशील तर तुझ्या बाळाचे शरीर तर तुझ्या मांडीवरच आहे. ते मृत शरीर आहे. ।॥११३॥ पाण्यात अनेक तरंग उठत असतात. ते जसे उठतात तसेच २७ फुटतात, कारण ते क्षणभंगुर आसतात. ते सर्व जर खोटेच मृगजळ आहे तर त्यातले बुडबुडे हे खरे कसे असतील ? ।।११४।।

चित्रींच्या वृक्षच्छाये बैसला कोण ।। चित्राग्नीनें कोणाचें जाळिलें सदन ।। तेथें गंगा लिहिली सहित मीन ।। कोण वाहोनि गेला तेथें ॥११५॥ वंध्यासुतें द्रव्य आणून ॥ भीष्मकन्या मारुतीस देऊन ॥ गंधर्वनगरींचें वऱ्हाडी आणून ॥ लग्न कोणें लाविलें ॥११६॥ वाऱ्याचा मंडप शिवून ॥ सिकतादोरें बांधिला आंवळून ।। शुक्तिकारजताचें पात्र करून ।। खपुष्पें कोणीं भरियेलें ॥११७ ।। कांसवीचें घालूनि घृत ।। मृगजळींचें मीन पाजळती पोत ।। तें चरणीं नूपुरें बांधोनि नाचत ।। जन्मांध पाहत बैसले ॥ ११८ ॥ अहिकर्णीचीं कुंडलें हिरोनी ।। चित्रींचें चोर आले घेवोनी ॥ हा प्रपंच लटिका मुळींहूनी ।। तो साच कैसा जाणावा ॥११९॥ मुळींच लटिकें अशाश्वत ।। त्याचा शोक करणें व्यर्थ ।। क्लेशतरूचें उद्यान समस्त ।। शरीर हें उद्भवलें ॥ १२० ॥ सकळ रोगांचे भांडार ॥ कृमिकीटकांचें माहेर । कीं पापाचा समुद्र । कीं अंबर भ्रांतीचें ॥ १२१ ॥ मूत्र श्लेष्म मांस रक्त ॥ अस्थींची मोळी चर्मवेष्टित ।। मातेचा विटाळ पितृरेत ।। अपवित्र असत्य मुळींच हें ॥ १२२ ॥ ऐसें हे शरीर अपवित्र ।। तें पशुमूत्रे झालें पवित्र ।। क्षुरें मूर्धज छेदिलें समग्र ।। इतुकेनि पावन केंवि होय ॥१२३॥

चित्रातील झाडाच्या सावलीत कोणी बसते का? चित्रातील अग्नी कोणाचे घर जाळेल का? चित्राच्या गंगेत कोणी वाहून गेले आहे का? ।।११५।। वांझेच्या मुलाने धन उभे करून, भीष्माची मुलगी मारुतीस देऊन, गंधर्व नगरीची वऱ्हाडी मंडळी आणून कोणी कधी लग्न लावले आहे का? ।।११६।। वाऱ्याचा मंडप कोणी वाळूच्या दोरीने बांधला आहे का? शिंपल्यातील चांदीच्या भांड्यात कोणी आकाशफुले भरली आहेत का? ।।११७।। कासवीच्या दुधाचे तूप करून, मृगजळातील माशांनी मशाली पाजळून, पायी घुंगरू बांधून नाच केला आणि तो कोणा आंधळ्याने डोळे भरून पाहिला असे कधी घडेल का? ।।११८।। सर्पाची कर्णफुले चोरांना चोरता येतात का? हा सारा प्रपंच मुळातच जर खोटा आहे तर तो खरा तरी कसा समजावा? ।।११९।। मुळातच हे सारे खोटे, हे टिकणारे आहे. त्याच्यासाठी शोक का करायचा? हे शरीर म्हणजे क्लेशाचे उद्यान आहे. ।।१२० || शरीर हे नाना रोगांचे भांडार, कृर्मीचे माहेर, पापाचा समुद्र आणि भ्रांतेचे आकाश आहे. ।।१२१।। शरीर हे रक्त, मांस, मल, मूत्र, कफ यांनी भरलेली, चामड्यांने गुंडाळलेली एक हाडांची मोळी आहे. त्याची उत्पत्ती ही मातेच्या वेटाळा आणि पित्याच्या वीर्यापासून झालेली आहे ते सर्वथा असत्य आणि अत्यंत अपवित्र असेच आहे. ।।१२२|| असे हे अपवित्र शरीर गोमूत्र शिंपडून पवित्र झाले किंवा केवळ डोक्याचे मुंडण केले तर ते पवित्र झाले असे कसे मानता येईल?।।१२३।।

शरण न जाती देशिकाप्रती ॥ तरी कैसेनि प्राणी तरती ॥ कल्पकोटी फेरे घेती ॥ मुक्त होती कधीं हे ॥१२४॥ सुमती तूं सांगें सत्वर ॥ तुझे जन्मोजन्मींचे कोठें आहेत भ्रतार ॥ अवघा हा मायापूर ॥ सावध सत्वर होई कां ॥ १२५ ॥ जयाचें हें सकळ लेणें ॥ मागतां देतां लाजिरवाणें ।॥ तनुघर बांधिलें त्रिगुणें ।। पांच वांसे आणोनियां ॥ १२६ ॥ याचा भरवसा नाहीं जाण ॥ केधवां लागेल न कळे अन्न ।। कीं हे झालें वस्त्र जीर्ण ॥ ऋणानुबंध तंव तगे ॥ १२७ ॥ मिथ्या जैसें मृगजळ ॥ कीं स्वप्नींचें राज्य डिसाळ ॥ अहा प्राणी पापी सकळ ॥ धन धान्य पुत्र इच्छिती ॥१२८॥ गंगेमाजी काष्ठे मिळती ॥ एकवट होती मागुती बिघडती ।। तैसीं स्त्रीपुरुर्षे बोलिजेती ।। खेळ मुळींच असत्य हा ॥१२९॥ वृक्षावरी पक्षी येती ।। कितीएक बैसती कितीएक जाती ।। आणिक्या तरुंवरी बैसती ।। अपत्यें तैसीं जाण पां ॥१३०॥ पधिक वृक्षातळीं बैसत ।। उष्ण सरलिया उठूनि जात ।। सोयरे बंधु आप्त ।। तैसेचि जाण निधरि ॥१३१॥

जे सद्‌गुरूच्या चरणी शरण जात नाहीत, असे कोट्यवधी प्राणी हे कसे बरं तरतील? ते कसे या जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होतील? ।।१२४।। हे सुमती, तुझे यापूर्वीच्या जन्मातले तुझे पती कुठे आहेत? अगं बाळ, हा मायेचा महापूर आहे. तेव्हा इथे विवेकाने सावध हो. ।।१२५।। इथले सारेच मागणे आणि देणे हे लाजिरवाणे आहे. मानवी शरीर हे सत्त्व रज आणि तम या त्रिगुणांनी भरलेले; पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. ।।१२६।। या देहाला कधी अग्नी लागेल ते काही कोणास सांगता येत नाही. मानवी जीवन हे एक फाटके वख आहे. ते जोवर ज्याचा त्याचा ऋणानुबंध आहे तोवर टिकते. ।।१२७॥ ज्याप्रमाणे मृगजळ हे खोटे फसवे असते, स्वप्नातला राजा किंवा राज्यसुख हे त्या स्वप्नापुरतेच असते, तसेच हे सारे आहे. इथे जन्मास आलेला जीव हा फक्त धनधान्य आणि पुत्र ह्याचीच अपेक्षा करीत असतो. ।।१२८|| ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहात ओंडके हे एकत्र वाहात येतात आणि कालांतराने ते एकमेकांपासून दुरावतात. ह्या जीवन प्रवाहातील जीवांची परस्पर भेट आणि विरह हा तसाच आहे. ।।१२९|| एखाद्या वृक्षावर काही काळासाठी पक्षी येऊन निवास करतात, त्यांच्या साथसोबतीने झाड सुखावते; पण काही काळाने ते पक्षी ते झाड सोडून दुसरीकडे निघून जातात. जीवनात मुलांचेही तसेच आहे. ।।१३०|| सावलीच्या अपेक्षेने झाडाखाली बसलेली माणसे जशी उन्हे उतरताच निघून जातात तसे संसार प्रपंचातले आप्त, सगे सोयरे हे काही काळाचेच सोबती असतात. ।।१३१।।

मायामय प्रपंचवृक्षीं ॥ जीव शिव बैसले दोन पक्षी ।। शिव सावधान सर्वसाक्षी ।। जीव भक्षी विषयफळें ॥१३२॥ तीं भक्षितांचि भुलोनि गेला ।। आपण आपणासी विसरला ।। ऐसा अपरिमित जीव भ्रमला ।। जन्ममरण भोगीतसे ॥ १३३ ॥ त्यांमाजी एकादा पुण्यवंत ।। सद्गुरूसी शरण रिघत ॥ मग तो शिव होवोनि भजत ॥ शिवालागीं अत्यादरें ॥१३४॥ ऐसें ऐकतां दिव्य निरूपण ।। पद्माकर सुमती उठोन ।। अष्टभावें दाटोन ॥ वंदिती चरण तयाचें ॥१३५॥ म्हणती एवढे तुझे ज्ञान ।। काय न करिसी इच्छेंकरून ।। तूं साक्षात उमारमण ।। भक्तरक्षणा धांवलासी ॥ १३६ ॥ मग मृत्युंजयमंत्र राजयोगी ।। सुमतीस सांगे शिवयोगी ।। मंत्रूनि भस्म लावितां अंगीं ।। व्यथारहित जाहली ते ।। १३७ ।। रंभाउर्वर्शीहूनि वहिलें ।। दिव्य शरीर तिचें झालें ।। मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिलें ।॥ बाळ उठिलें तत्काळ ॥ १३८ ॥ व्रणव्यथा जावोनि सकळ ।। बत्तीसलक्षणी झाला बाळ ॥ मग शिवध्यान उपासना निर्मळ ॥ सुमतीबाळ उपदेशिलें ।। १३९ ।।

हा प्रपंचवृक्ष अगदी तसाच आहे. याच्या फांदीवर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. त्यांच्यातला शिव आहे तो सर्वसाक्षी असून, तोच सतत जागृत असतो. तर जीव हा पक्षी केवळ या प्रपंच वृक्षाच्या केवळ विषयी फळाचाच आस्वाद घेत असतो. ।।१३२|| हे विषय फळांचे सेवन जीवरूपी पक्ष्याला गोड लागते, ते त्यास सुखावते. त्याला आपल्या स्व चा विसर पडतो, तो भ्रमतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यांत परत परत अडकतो. ।।१३३।। इथे एखादा भाग्यवंत साक्षी जागृत जीव असतो की, जो सद्‌गुरूस शरण जाऊन आपले स्वस्वरूप ओळखून घेत असतो. जो गुरूकडून शिवस्वरूप जाणून घेतो, त्यास नीट ओळखतो आणि त्या शिवाची उपासना करतो. त्याची भक्ती करतो. ।।१३४।। हे आणि असे दिव्य बोध निरूपण ऐकल्यावर सुमती आणि पद्माकर ह्यांच्या मनातील अष्टभाव जागे झाले. त्यांनी मोठ्या विनयाने त्या शिवयोग्याचे पाय धरले. ।।१३५॥ ते म्हणाले, महाराज, आपण खरोखरच धन्य आहात, आपले ज्ञान अगाध आहे. आपण मनात आणले असता प्रत्यक्ष काहीही करू शकता. असे शिवरूप आपणच आहात असे आम्हांस वाटते. जणू आपल्या रूपाने तो सदाशिवच आमचे कल्याण करण्याकरता आला आहे. ।।१३६।। मग त्या शरणागत झालेल्या सुमती राणीस त्या योग्याने मृत्युंजय जप सांगितला. तसेच त्या मंत्राचा जप करून त्याने तिच्या मस्तकी भस्म लावताच तिची ती शारीरिक व्याधी दूर झाली. ।।१३७॥ तिचे शरीर हे आता एखाद्या रंभा, उर्वशी पेक्षाही अत्यंत सुंदर आणि तेजस्वी झाले. तसेच शिव महामृत्युंजय जप करून तिने त्या योग्याच्या आज्ञेप्रमाणे बाळास भस्म लावताच तो राजकुमारही पुन्हा जिवंत झाला. ।।१३८|| त्या दोघांच्या शरीरावर त्या व्याधीच्या खुणा म्हणून राहिल्या नाहीत. मग त्या शिवयोग्याने त्या मायलेकरांना शिवमंत्र जप ध्यान आणि शिवोपासनेचा उपदेश केला. ।।१३९।।

परीस झगडतां पूर्ण ॥ लोह तत्काळ होय सुवर्ण ॥ तैसीं दोचें दिव्यरूप जाण ॥ होती झाली ते काळीं ।॥१४० ॥ आश्चर्य करी पद्माकर ॥ म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र ।। काळमृत्युभय अपार ।। त्यांपासूनि रक्षी गुरुनाथ ॥४१ ॥ गुरुचरणीं रत होती सदा ॥ त्यांसी कैंची भवभय आपदा ॥ धनधान्यांसी नाहीं मर्यादा ॥ भेद खेदां वारिलें ॥१४२॥ बाळ चरणांवरी घालोनी ॥ सुमती लागे सप्रेम चरणीं ॥ म्हणे सद्गुरु तुजवरूनी ॥ शरीर सांडणें हें माझें ॥१४३॥ या शरीराच्या पादुका करून ।। तुझिया दिव्य चरणीं लेववीन ॥ तरी मी नव्हे उत्तीर्ण ॥ उपकार तुझें गुरुमूर्ती ॥४४॥ मग शिवयोगी बोलत ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत ।। तुझिया पुत्रासी होईल प्राप्त ।। राज्य पृथ्वीचें करील हा ।।१४५ ।। त्रिभुवनभरी होईल कीर्ती ।। निजराज्य पावेल पुढती ।। भद्रायु नाम निश्चिती ।। याचें ठेविलें मीं जाण ॥१४६ ।। थोर होय भद्रायु बाळ ॥ तंववरी क्रमीं येथेंचि काळ ॥ मृत्युंजयमंत्र जप त्रिकाळ ॥ निष्ठा धरूनि करीत जा ।।१४७ ।।

ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे क्षणात सोने होते तसे त्या दोघांनाही भस्म अंगी लावताच बरे झालेला तो चमत्कार साऱ्या नगरवासीयांनी पाहिला. ।।१४०।। या झालेल्या प्रकाराने पद्माकरास अपूर्व असा आनंद झाला. तोही शिवयोग्याच्या चरणांवर नतमस्तक होत त्यास म्हणाला, हे सद्‌गुरूरूपी बोगीराजा, तू खरोखरच धन्य आहेस. तुझे सामर्थ्य अगाध आहे. तो मंत्र, त्याची दिव्य शक्ती अद्भुत आहे. हे गुरुराया, काळ, मृत्यू आणि या भवभयापासून आम्हास दूर करणारा तूच खरा आमचा उद्धारक आहेस. ।।१४१।। जे गुरूचरणी लीन होतात त्यांना संसार भय राहात नाही. त्यांच्या भाग्यास तोड नाही. गुरुकृपेने त्याची बुद्धी भेदरहित होते. सारे संभ्रम दूर होतात. जीवनातील दुःख, कष्ट, यातना, खिन्नता दूर होते. ।।१४२ ।। त्यानंतर सुमतीने आपल्या सुपुत्रास त्या योग्याच्या चरणांवर घातले आणि ती म्हणाली, “हे गुरुराया! आता मी माझा देह हा तुमचे चरणावर वाहिला आहे. त्याचे तुम्हीच खऱ्या अथनि कल्याण करा.” ।।१४३॥ हे गुरुराया, तुझे माझ्यावर किती उपकार आहेत म्हणून सांगू! माझ्या शरीराच्या पादुका करून जरी तुझ्या चरणी घातल्या तरी ते उपकार फिटणार नाहीत. ।।१४४।॥ तेव्हा त्या माय लेकरांना आपला सव्य हस्त उंचावून शुभाशीर्वाद देत तो शिवयोगी म्हणाला, “हे सुमती, तुझ्या पुत्राचे भाग्य थोर आहे. त्यास आरोग्य, राज्य, सुखसंपत्ती आणि पृथ्वीचे राज्य लाभेल. ।।१४५।। तुझा हा पुत्र या भूलोकी स्वतःचे मोठे राज्य निर्माण करेल, त्यांची कीतीं सर्वत्र पसरेल”. त्याचे मी भद्रायू असे नामकरण करीत आहे. ।।१४६।। नंतर तो शिवयोगी महणाला, हा बाळ मोठा होईपर्यंत तुम्ही याच नगरात निवास करा. शिवोपासना आणि आराधना करा. नित्य शिवाच्या सिद्ध महामृत्युंजय मंत्राचा त्रिकाल जप करा. भगवान शिव तुमचे कल्याण करतील. ।।।१४७।

हा राजपुत्र निश्चित ।। लोकांत प्रगटों नेदीं मात ।। हा होईल विद्यावंत ।। चतुःषष्टिकळाप्रवीण ।।१४८।। ऐसें शिवयोगी बोलोन ।। पावला तेथेंचि अंतर्धान ।। गुरुपदांबुज आठवून ।। सुमती सद्गद क्षणाक्षणां ।।१४९ ।। पद्माकरासी सुख अत्यंत ।। सुनय पुत्राहूनि बहुत ।। भद्रायु त्यासी आवडत ।। सदा पुरवीत लाड त्याचा ।।१५० ॥ पद्माकरें आपुली संपत्ती वेंचून ।। दोघांचें केलें मेखलाबंधन ।। दोघांसी भूषणें समान ।। केलें संपन्न वेदशास्त्रीं ।। १५१ ।। द्वादश वर्षांचा झाला बाळ ।। धीर गंभीर परम सुशीळ ॥ मातेच्या सेवेसी सदाकाळ ॥ जवळी तिष्ठत सादर ॥ १५२ ॥ पदरीं पूर्वसुकृताचें पर्वत ॥ शिवयोगी प्रगटला अकस्मात ।। सुमती भद्रायु धांवत ।। पाय झाडीत मुक्तकेशीं ।॥ १५३ ॥ नयनोदकें चरणक्षालन ।। केशवासनें पुसिलें पूर्ण ।। जें सुगंधभरित जाण ।। स्नेह तेंचि लाविलें ॥१५४॥ वारंवार करिती प्रदक्षिणा ।। दाटती अष्टभावेंकरून ।। षोडशोपचारें पूजन ।। सोहळा करिती अपार ।॥ १५५ ॥ स्तवन करीतसे तेव्हां सुमती ।। तुझिया प्रसादेकरूनि मी पुत्रवंती ।। यावरी भद्रायूसी नीती ।। शिवयोगी शिकवीतसे ॥१५६॥

आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. हा मुलगा म्हणजे राजपुत्र आहे हे कोणास सांगू नका. तो पुढे नाना विद्या, कला आणि कौशल्यात मोठा निपुण होईल. ।।१४८।। हे आणि असे त्यांना सांगत असताना बोलत असतानाच अचानकपणे तो शिवयोगी अंतर्धान पावला. ते तिघे केवळ त्याच्या स्मरणातच रंगून गेले. ।।१४९।। या झाल्या प्रकाराने त्या सश्रद्ध सहृदयी पद्माकर वैश्यास मोठा आनंद झाला. एक समाधान झाले. तो आता त्या भद्रायूवर आपल्या मुलासारखेच प्रेम करू लागला. ।।१५०।। पद्माकराने भद्रायू हा आठ वर्षाचा होताच आपल्या मुलाबरोबरच त्यांचीही मुंज केली. त्यास नाना वस्त्रालंकार घातले. दोन्ही कुमारांना त्याने उत्तम प्रकारचे वेदशास्त्र, कला आणि कौशल्यांचे शिक्षण देवविले, त्यांना तयार केले. ।।१५१।। होता होता एक तपाचा काळ लोटला. भद्रायू आपल्या मातेची नेहमी काळजी घेत असे. तो विद्या कलातही प्रवीण झाला. तो स्वभावाने शांत, सत्शील आणि सद्‌गुणी होता. ।।१५२ ।। त्यांच्या पूर्व पुण्याईनेच आणि सततच्या शिवोपासनेच्या बळाने तो शिवयोगी पुन्हा त्यांच्याकडे आला. तेव्हा सुमतीने आपल्या मोकळ्या केसांनी श्री गुरुदेवाच्या चरणांची धूळ झाडली. ।॥१५३॥ तिने आपल्या डोळ्यातील गंगायमुनांच्या पवित्र पाण्याने गुरूचरण प्रक्षाळले. त्यावर आपल्या निष्ठेच्या अत्तराचे विलेपन केले. ।।१५४।। त्या वेळी मोठ्या कृतज्ञता भावानी त्या शिव योग्याचे पूजन करीत असताना त्या दोघांना अपूर्व आनंद झाला. त्यांचे अष्टभाव दाटून आले. त्यांनी मोठ्या प्रेमभराने तो शिवयोगी पूजनाचा भाग संपन्न केला. ।।१५५।। उभयतांनी योगी चरणांस वंदन करून त्यांच्या सन्निध बैठक मारली. तेव्हा शिवयोगी हे भद्रायूस काही नितीपाठ शिकवू लागले. ।। १५६ ।।

श्रुतिस्मृतिपुराणोक्त पाहीं ।। धर्मनीतीं वर्तत जाई ।। मातापितागुरुपायीं ।॥ निष्ठा असों दे सर्वदा ॥१५७।। गोभूदेव-प्रजापाळण ।। सर्वांभूर्ती पहावा उमारमण ।। वर्णाश्रमस्वधर्माचरण ।। सहसाही न सांडावें ॥१५८॥ विचार केल्यावाचूनियां ।। सहसा न करावी आन क्रिया ।। मार्गे पुढे पाहोनियां ॥ शब्द बोलावा कुशलत्वें ॥१५९॥ काळ कोण मित्र किती ।। कोणी द्वेषी शत्रु किती ।। आय काय खर्च किती ।। पाहावें चित्तीं विचारूनियां ॥ १६० ॥ माझें बळ किती काय शक्ती ॥ आपुले सेवक कैसे वर्तती ।। यश कीं अपयश देती ॥ पहावें चित्तीं विचारूनी ॥ १६१ ॥ अतिथी देव मित्र ।। स्वामी वेद अग्निहोत्र ।। पशु कृषि धन विद्या सर्वत्र ।। घ्यावा समाचार क्षणक्षणां ॥ १६२ ॥ लेंकरूं भार्या अरि दास ।। सदन गृहवार्ता रोगविशेष ॥ येथें उपेक्षा करितां निःशेष ।। हानि क्षणांत होत पैं ।॥ १६३ ॥ ज्या पंथे गेले विद्वज्जन ।। आपण जावें तोचि पंथ लक्षून ।। माता-पिता-यतिनिंदा जाण ।। प्राणांतींही न करावी ।। १६४ ।।

बाज्या, आपली शानो, नीली धर्मावर श्रद्धा असायला हवी. तू वेदशाखे, पुराणे ह्यांचा अभ्यास कर. तुझे आचरण हे धर्मास अनुसरून आणि आचारनिष्ठ ठेवा. निल्य मातापिता, गुरू ह्यांना देवतासमान मानून त्यांचा आदर सन्मान कर. ।।१५७॥ गोब्राह्मण आणि प्रजा ह्याचे रक्षण कर. सर्वांभूती त्या सवाशिवास पाहा, वर्ण, धर्म आणि आश्रम ह्यांच्या बंधनांचे कधीही उल्लंघन करू नकोस. ||१५८॥ कोणतीही कृती ही विचार केल्याशिवाय करू नकोस, मानेपुढे पाहूनच कौशल्यपूर्ण बोलावे. ||१५९|| काळ वेळ ह्याचे भान राखावे, शत्रू आणि मित्र ह्यांची अचूक पारख करावी. आय आणि व्यय म्हणजेच आवक आणि खर्चाचे गणित नीट बसवावे. नेहमी विवेकी विचारी असावे. ||१६०|| आपल्या शक्तीसामर्थ्याचा, सेवकांच्या विश्वासाचा नीट विचार करावा. त्याचे सतत परीक्षण करावे. यशाने उन्मत्त होऊ नये. अपयश पदरी आले तर त्याने खचून न जाता त्याची कारणे, चुका शोधाव्यात ॥१६१॥ अतिथी, देव, मित्र, धनी, वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन, विद्या या सर्वांचा क्षणोक्षणी आढावा घ्यावा. त्याबाबत सतर्क असावे. ॥१५२॥ आपली मुले, पत्नी, आप्त, दास, सेवक यांच्या बाबतीतसुद्धा सदा जागरूक असावे. त्यासंदर्भात थोडेही दुर्लक्ष करू नये. आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहावे. ते सांभाळावे. या पैकी कोणत्याही गोष्टीकडे थोडेफार जरी दुर्लक्ष झाले, तर पुढे मोठी हानी होऊ शकते, हे कायम लक्षात डवावे. ।।१६३।। या जगात वडील, ज्येष्ठ आणि ज्ञानी मंडळी ज्या सन्मार्गाने जातात त्या मार्गाने आपणही जावे, प्राणांतीही मातापिता, गुरू चती यांची निंदा करू नये. ।।१६४।।

वैश्वदेवसमयीं अतिथी ।। आलिया त्यासी न पुसावी याती ।। अन्न वस्त्र सर्वांभूतीं ।॥ द्यावें प्रीत्यर्थ शिवाचिया ॥ १६५ ॥ परोपकार करावा पूर्ण ॥ परपीडा न करावी जाण ॥ करावें गोब्राह्मणरक्षण ॥ सत्य सुजाण म्हणती तया ॥ १६६ ॥ निंदा वाद टाकोन ॥ सर्वदा कीजे शिवस्मरण ॥ तेंच म्हणावें मौन ।। शिवसेवन तप थोर ॥ १६७ ॥ परदारा आणि परधन ।। हें न पहावें जेवीं वमन ।। करावें शास्त्रश्रवण ।। शिवपूजन यथाविधि ॥ १६८ ॥ स्नान होम जपाध्ययन ।। पंचयज्ञ गोविप्रसेवन ।। श्रवण मनन निजध्यास पूर्ण ।। अनालस्यें करावीं ॥ १६९ ॥ सुरत निद्रा भोजन ॥ येथें असावें प्रमाण ॥ दान सत्कर्म अभ्यास श्रवण ।। आळस येथे न करावा ॥१७० ।। काम पूर्ण धर्मपत्नीसी ।। निषिद्ध जाण परयोषितेसीं ।। क्रोधें दंडावें शत्रूसी ।। साधुविप्रांसी नमिजे सदा ॥ १७१ ॥ द्वेषियांसीं धरावा मद ।। संत-भक्तांसीं नम्रता अभेद ।। संसाररिपूसीं मत्सर प्रसिद्ध ।। असावें निर्मत्सर सर्वांभूतीं ॥ १७२ ॥ दुर्जनासी दंभ दाविजे ॥ भल्याचें पदरज वंदिजे ।। अहंकारें पृथ्वी जिंकिजे ॥ निरहंकार द्विजासी ॥१७३॥ वाचा सावध शिवस्मरणीं ।। पाणी सार्थक दानेंकरूनीं ।। पाद पावन देवालययात्रागमनीं ।॥ नित्य शिवध्यानीं बैसावें ।॥१७४॥

माध्यान्ह काळी दारी आलेल्या अतिथीस शिव स्वरूप मानून त्याचा आदर पूजा करून त्यास भोजन द्यावे. ।।१६५|| नेहमी अपकाराची फेड उपकाराने करावी, उगाच कोणासही नाहक पीडा करू नये. असे जो वागतो त्यालाच सुजाण असे म्हणतात. ।।१६६।। कोणाचीही निंदानालस्ती न करणे,संसारारपूसा मत्सर प्रसिद्ध ।। असावं निर्मत्सर सर्वांभूती ॥ १६७ ॥ दुर्जनासी दभ दाविजे ॥ भल्याचे वादविवादात वेळ वाया घालविणे असे न करता शिवनामाचा जप करावा, शिवध्यान करावे, मौन पाळावे, तप करावे. ।।१६७॥ परस्त्री आणि परक्याचे धन हे वमनासारखे त्याज्य मानावे. नित्य शास्त्र धर्माचे पालन करावे. नित्य शिव आराधना करावी. ।। १६८ || नित्य स्नान, जपतप, होमहवन, अध्ययन करावे. गोब्राह्मणांची सेवा करावी, वेदशास्त्राच्या श्रवणास आळस, कंटाळा करू नये. ।।१६९।। कामेच्छा, निद्रा आणि भोजन ह्या गोष्टी संयमित असाव्यात. दान, सत्कर्मे, अभ्यास श्रवण, मनन, चिंतन ह्यात आळस करू नये. ।।१७०।। आपण आपल्या धर्मपत्नीशीच कामक्रीडा करावी, परस्त्री ही निषिद्ध मानावी. शांत राहावे, क्रोध करू नये, साधूसंत सज्जनांचा आदर करावा, त्याम्ना नित्य वंदन करावे. ।।१७१।। आपला व्देष करणाऱ्या बद्दल ही क्षमाशील असावे. संतांच्या बाबतीत अनादर, भेद करू नये. संसाररूपी शत्रूचा मत्सर करावा, त्यास दूर लोटावे, परमार्थाशी जवळीक साधावी. ।।१७२।। दुर्जनांच्या बाबतीत दांभिकता ठेवावी. संत आणि सज्जन ह्यांच्याबाबत मनात आदरभाव ठेवून, मनात उदारता राखून भूलोकी आनंदाने राज्य करावे. विप्रजनांबद्दल मनात प्रेम बाळगावे. ।।१७३।। नित्य शिवाचे पूजन करावे. हातांनी दानधर्म करावा. पायांनी तीर्थक्षेत्राच्या यात्रा कराव्यात. नित्य शिवाचे ध्यानात रमावे. ।।१७४।।

पुराणश्रवणीं श्रोत्र सादर ।। त्वचा संतआलिंगनीं पवित्र ॥ सार्थक शिवध्यानीं नेत्र ।। जिव्हेनें स्तोत्र ॐ वर्णावें ॥ १७५ ॥ शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणीं ।। ये रीतीं इंद्रिये लावावीं भजनीं ।। दीन अनाथ अज्ञान देखोनी ।। तयांवरी कृपा कीजे ॥ १७६ ॥ ईश्वरीं प्रेम संतांसीं मैत्री ॥ देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करीं ॥ युक्तनिद्रा युक्ताहारी ।। मृगया करीं परम नीतीनें ॥ १७७ ॥ अतिविद्या अतिमैत्री ।। अतिपुण्य अतिस्मृती ।। उत्साह धैर्य दान धृती ॥ वर्धमान असावीं ॥१७८॥ आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र ।। मैथुन औषध सुकृत मंत्र ॥ दान मान अपमान हीं सर्वत्र ॥ गुप्त असावीं जाणिजे ॥१७९॥ नष्ट पाखंडी शठ धूर्त ।। पिशुन तस्कर जार पतित ।। चंचळ कपटी नास्तिक अनृत ॥ ग्राम्य सभेसी नसावे ॥१८०॥ निंदक शिवभक्ति-उच्छेदक ।। मद्यपानी गुरुतल्पक ॥ मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक ।। त्यांचें दर्शन न व्हावें ।।१८१ ॥ दारा धन आणि पुत्र ।। यांसी आसक्त नसावें अणुमात्र ।। अलिप्तपणें संसार ।। करोनि असक्त असावें ॥१८२॥ बंधु सोयरे श्वशुर स्वजन ।। यांसीं स्नेह असावा साधारण ॥ भलता विषय देखोन ।। आसक्ति तेथें न करावी ॥१८३॥

पुराणांच्या श्रवणाने कान पवित्र होतात, संतांच्या स्पर्शान त्वचा पवित्र होते, शिवध्यानाने डोळ्यांचे पाहणे धन्य होते, वाणीने शिव नामोच्चारण केल्यास ती पावन होते. ।।१७५।। शिवाच्या पूजेच्या निर्माल्याचा नाकाने सुगंध घ्यावा. आपली सर्व इंद्रिये ही शिवसेवेत लावावीत. दीन, अनाथ व अज्ञानी अशा जीवांना दूर न लोटता त्यांच्यावर कृपा करावी. ।।१७६|| देवाविषयी प्रेम, संतांबद्दल आदर बाळगावा, दुष्ट दुराचारी लोकांपासून दूर रहावे. नीतिपूर्वक आचरण करावे. शिकार हीसुद्धा न्यायाने करावी. ।।१७७॥ विद्या, धन, मैत्री, पुण्य, दान यांचा अतिरेक करू नये. उत्साह, धैर्य, दान आणि आपली परोपकारी वृत्ती ही दिसामासांनी वृद्धिंगत करीत जावी. ॥१७८॥ आपले वित्त, आयुष्य, धन, औषध, मंत्र, दान, झालेला मानापमान ह्या सर्व गोष्टी इतरांपासून गुप्त राखाव्यात. ।।१७९।। दुष्ट, पाखंडी, पापी, दुराचारी, परस्त्री गमन करणारा, देवांची निंदा करणारा, नास्तिक, कपटी अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे, सावध असावे. ॥१८०॥ जे निंदक आहेत, शिवद्वेषी आहेत, अभक्त आहेत, मद्यषी, गुरुपत्नीशी संग करणारे, वाटमारी करणारे, घातकी, द्रोही, दुराचारी ह्यांच्याशी सलगी करू नये. ।।१८१।। पत्नी, पुत्र आणि धनाबाबत मनात अनावश्यक आसक्ती ठेवू नये. संसार अलिप्त वृत्तीने करावा, संयमित राहावे. ।।१८२।। आपले सगेसोयरे, आप्त, बंधू ह्यांच्याशी अति सख्य ठेवू नये. त्यांचा दुस्वासही करू नये. भलत्याच गोष्टीची अभिलाषा, आसक्ती राखू नये. ।।१८३।।

करावें रुद्राक्षधारण । मस्तकीं कंठीं दंडीं करभूषण ।। गेलिया प्राण शिवपूजन ।। सर्वथाही न सांडावें ॥१८४॥ शिवकवच सर्वांगीं ।॥ लेऊं शिकवी शिवयोगी ।। भस्म चर्चितां रणरंगीं ।। शस्त्रास्त्रबाधा न होय ॥१८५॥ काळमृत्युभयापासून ॥ रक्षी मृत्युंजयऔपासन ।। आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न ।। यांसी जीवें मारावें ॥ १८६ ॥ सोमवारव्रत शिवरात्र प्रदोष ॥ विधियुक्त आचरावें विशेष ॥ शिवहरिकीर्तन निर्दोष ॥ सर्व सांडूनि ऐकावें ॥ १८७ ॥ महापर्व कुयोग श्राद्धदिनीं ।। व्यतिपात वैधृति संक्रमणीं ॥ न प्रवर्तावें मैथुनीं ।। ग्रहणीं भोजन न करावें ॥१८८ ॥ सत्पात्रीं देतां दान ।। होय ऐश्वर्य वर्धमान ।। अपात्री दानें दारिद्र्य पूर्ण ॥ शास्त्रप्रमाण जाणिजे ॥१८९॥ वेद शास्त्र पुराण कीर्तन ।। गुरुब्राह्मणमुखें करावें श्रवण ।। दान दिधल्याचें पाळण ।। करितां पुण्य त्रिगुण होय ॥१९० ॥ अपूज्याचें पूजन ।। पूज्य त्याचा अपमान ।। तेथें भय दुर्भिक्ष मरण ।। होतें जाण विचारें ॥ १९१ ॥ महाडोहीं उडी घालणें ।। महापुरुषासीं विग्रह करणें ।॥ बळवंतासीं स्पर्धा बांधणें ।। हीं द्वारें अनर्थाचीं ॥ १९२॥

शिवोपासकाने मस्तक, कंठ, दंड आणि हातात शास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करावेत. अगदी प्राण जायची वेळ आली तरी आपली शिवपूजा सोडू नये, उपासनेत खंड पडू देऊ नये. ।।१८४।। या बरोबरच त्या शिवयोग्याने भद्रायूस असेही सांगितले की, नेहमी अंगावर शिवनामकवच धारण करावे. रणांगणात उतरत असताना अंगास भस्मलेपन केले असेल तर त्यावर शत्रू सैन्याच्या शस्त्रांचे आघात होत नाहीत, रक्षण होते. ।।१८५।। शिवाच्या महामृत्युंजय जपमंत्राने काळमृत्यूचे भय राहात नाही, अपमृत्यू येत नाही. जे वाटमारी करतात, जे आततायी आहेत, घातक आहेत अशांना कठोर शासन करावे. ।।१८६।। सोमव्रत, शिवरात्र, प्रदोष ही व्रते अवश्य करावीत. हर आणि हरी ह्यांच्यात भेद करू नये. दोघांनाही पूज्य व वंदनीय मानावे. ।।१८७।। महापर्व, शिवरात्र, संक्रांत कुयोग, श्राद्धाचा दिवस हे दिवस मैथुन, अंगसंग ह्यासाठी उचित नाहीत. या दिवशी प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टी टाळाव्यात, त्यापासून दूर रहावे. ।।१८८।। जर आपण सुयोग्य पात्री दान केले आपल्या ऐश्वर्याची वृद्धी होते. याचे उलट कुपात्री दान दिले असता दारिद्र्य प्राप्त होते, असे शास्त्रांनी सांगितले आहे. ।।१८९।। वेदशास्त्र आणि पुराणे यांचे विद्वान ब्राह्मणांच्या मुखातून श्रवण करावे. दान हे विधिवत संकल्प करून अन् तेही सुपात्री दिल्यास त्या दानाचे तीन पट पुण्य प्राप्त होते. ।।१९०।। जर अपूजनीयाचे पूजन केले किंवा पूजनीयाचा अनमान केला तर भय, दुःख, दुष्काळ, मृत्यू अशा गोष्टी घडतात, हे नीट लक्षात घ्यावे. ।।१९१।। नीटशी खोली माहीत नसलेल्या डोहात उडी मारणे, सत्पुरुषांशी वैर धरणे, बरोबरीच्या सामर्थ्यवान व्यक्तीबरोबर स्पर्धा करणे, ह्या गोष्टी घातक ठरतात. त्या कौशल्याने टाळाव्यात.।।१९२।

दानें शोभे सदा हस्त ॥ कंकण मुद्रिका भार समस्त ॥ श्रवर्णी कुंडलें काय व्यर्थ ॥ श्रवणसार्थक श्रवणेंचि ।। १९३ ।। ज्याची वाचा रसवंती ।। भार्या रूपवती सती ।। औदर्य गुणसंपत्ती ।। सफळ जीवित्व तयाचें ॥१९४।। देईन अथवा नाहीं सत्य ।। हैं वाचेसी असावें व्रत ।। विद्यापात्रे येती अमित ।। सद्यः दान त्यां दीजे ॥१९५॥ विपत्तिकाळीं धैर्य धरीं ।॥ वादीं जयवंत वैखरी ।। युद्धांमाजी पराक्रम करीं ॥ याचकांसी पृष्ठी न दाविजे ।।१९६ ।। ब्राह्मणमित्रपुत्रांसमवेत ।। तेंच भोजन उत्तम यथार्थ ।। गजतुरंगांसहित पंथ ।। चालणें तेंचि श्रेष्ठ होय ॥ १९७ ॥ ज्या लिंगाचें नाहीं पूजन ।। तेथें साक्षेपें पूजा करावी जाऊन ।। अनाथप्रेतसंस्कार जाण ।। करणें त्या पुण्यासी पार नाहीं ।।१९८ ।। ब्रह्मद्वेषाएवढे विशेष ।। मारक नाहीं कदा विष ।। सत्समागम रात्रंदिवस ।। तृच्छ सुधारस त्यापुढें ।। १९९ ।। प्रतापें न व्हावें संतप्त ।। परसौख्यें हर्षभरित ।। सद्वार्ता ऐकतां सुख अत्यंत ॥ तोचि भक्त शिवाचा ॥ २००॥ पाषाण नाम रत्न व्यर्थ ॥ चार रत्नें आहेत पृथ्वीत ॥ अन्न उदक सुभाषित ।। औदार्य रत्न चौथे पैं ।।२०१।।

हाताचे खरे भूषण हे दान आहे. हातातल्या बांगड्या कंकणे, अंगठ्या ही खरी भूषणेच नाहीत तर ती ओझी आहेत. शास्त्रधर्माचे उत्तम श्रवण करणे हे कानांचे भूषण आहे. कर्णफुले हा दिखावाचा अलंकार आहे. ।।१९३|| ज्या पुरुषाकडे मधुर वाणी आहे, घरात सुविद्य पत्नी आहे, जो गुणसंपन्न आहे, जो उदार आहे त्याचे जीवनच खऱ्या अर्थाने सार्थ आहे. ।। १९४।। ‘देईन’ किंवा ‘देणार नाही’ हे वाणीचे व्रत असावे. जे विद्याध्ययन करीत असताना काही मागणी करतात अशांना त्या गोष्टी लगेच द्याव्यात. ||१९५|| अडीअडचण आणि संकट काळात धैर्य धरावे वादविवादाच्या स्पर्धेत आपल्या बोलण्याला यश यावे. युद्धात विजयश्री प्राप्त व्हावी, कोणी आपल्याकडे काही मागावयास आला तर सहसा त्यास नाही म्हणू नये. ।।१९६।। ब्राह्मण, मित्र आणि पुत्र ह्यांच्यासोबत जे सहभोजन केले जाते ते भोजन श्रेष्ठ होय. हत्ती, घोदे, यांच्यासोबत चालत जाणे हे भूषणास्पद असते. ।।१९७|| ज्या शिवलिंगाची कोणी पूजा केली नसेल अशा शिवलिंगाची मनःपूर्वक पूजा करणे, अनाथ प्रेतास मंत्राग्नी देणे, यासारख्या गोष्टी अधिक पुण्य देत असतात. ।।१९८।। या जगात ब्रह्मद्वेषाइतके दाहक दुसरे विष नाही. संत समागम, सत्संग ह्यासारखे दुसरे अमृतपान नाही. ।। १९९|| जो जीव दुसऱ्याच्य पीडेने व्यथित होतो, जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी व आनंदाने आनंदी होतो, ज्याला दुसऱ्याचे भले झाले हे ऐकून समाधान होते तो जीव म्हणजे प्रतिशिवच मानावा. ।।२००।। जमिनीतून मिळणारी रत्ने ही रूरी तर पाषाणच असतात. खरी रत्ने ही चार आहेत. ती म्हणजे अन्न, उदक, सुभाषित आणि औदार्य. ।।२०१।।

वर्म कोणाचें न बोलावें ।। सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावें ।। भाग्याभाग्य येत स्वभावें ।। स्वधर्मध्रुव न ढळावा ।। २०२ ।। पूर्वविरोधी विशेष ।। त्याचा न धरावा विश्वास ।। गर्भिणी पाळी गर्भास ॥ तेवीं प्रजा पाळी कां ।। २०३ ।। गुरु आणि सदाशिव ।। यांसीं न करावा भेदभाव ।। भाग्य-विद्यागर्व सर्व ।। सोडोनि द्यावा जाण पां ॥२०४॥ नराची शोभा स्वरूप पूर्ण ॥ स्वरूपाचें सद्गुण आभरण ।। गुणाचे अलंकार ज्ञान ।। ज्ञानाचें भूषण क्षमा शांती ॥२०५॥ कुल शील विद्या धन ॥ राज्य तप रूप यौवन ।। या अष्टमदेंकरून ।। मन भुलों न द्यावें ।॥२०६ ।। ऐसा नानापरी शिवयोगी ।। बोधिता झाला भद्रायूलागीं ।। हे नीति ऐकतां जगीं ।। सांकडे न पडे सर्वथा ।।२०७।। सातवा अध्याय गिरि कैलास ।। यावरी वास्तव्य करी उमाविलास ।। पारायण प्रदक्षिणा करिती विशेष ।। निर्दोष यश जोडे तयां ।।२०८।। कीं हा अध्याय हिमाचल ।। भक्तिभवानी कन्या वेल्हाळ ॥ तिस वरोनि पयःफेनधवल ।। श्वशुरगृहीं राहिला

कोणाचीही एखादी वर्माची गोष्ट चारचौघांत उघडी करू नये. नेहमी सद्भक्तांचे मंगल आशीर्वाद गोळा करावेत. आपल्या वाट्यास येणारे भाग्य किंवा दुर्भाग्य हे आपल्यास पूर्वकर्माचे फळ असते हे विसरू नये. आपण आपल्या स्वधर्माचरणापासून कधीही परावृत्त होऊ नये. ||२०२|| आपल्या विरोधात असलेल्या व्यक्तीवर कधीही फाजील विश्वास ठेवू नये. राजा ह्या नात्याने राज्यकारभार करीत असताना ज्याप्रमाणे माता आपल्या पोटीच्या गर्भाची काळजी घेते, तसे राजाने प्रजेची काळजी घ्यावी. ।।२०३।। देव आणि गुरू ह्यांच्यात भेद करू नये. आपल्या श्रीमंतीचा, वैभवाचा अहंकार, विद्येची घमेंड बाळगू नये. ||२०४|| माणसाचे पौरुष हे त्याचे खरे रूप आहे. सद्‌गुणांचे अलंकार हे अंगावर असायला हवेत. क्षमा आणि शांती ह्या खऱ्या ज्ञानवंताच्या खुणा आहेत. ।।२०५।। कुल, विद्या, धन, शील, राज्य, तप, रूप आणि तारुण्य या आठ गोष्टींचा शहाण्या माणसाने कधीही माज येऊ देऊ नये. त्याने उन्मत्त होऊ नये. ।।२०६।। श्रीधर कवी म्हणतात की, याप्रकारे त्या भद्रायूस शिवयोग्यांनी जो नीतिबोध केला तो आपल्या सर्वांनाच उद्बोधक असाच आहे. ह्या नीती बोधाचे स्मरण ठेवून त्यानुसार जगात आचरण केले असता अशा व्यक्तीस जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. ।।२०७|| असा हा श्रीशिवलीलामृताचा सातवा अध्याय म्हणजे जणू कैलास पर्वतच आहे. त्याच्या श्रवणरूपी प्रदक्षिणेने भक्त भाविकांना सर्वत्र यशप्राप्ती होते. त्यांचा सर्व प्रकारच्या दोषांचे निराकरण होते. ।। २०८।। हा सातवा अध्याय म्हणजे जणू हिमालय पर्वत असून, शिवभक्ती ही त्याची कन्यास्वरूप आहे. तो भगवान शिव त्या भक्ती कन्येस वरून तिच्यासोबत या अध्यायरूपी हिमालयात येऊन निवास करून राहिला.

पुढील अध्यार्थी कथा सुरस ।। शिवयोगी दया करील भद्रायूस ।। ब्रह्मानंद निशिदिवस ।। श्रवण करोत विद्वज्जन ।।२१० ।। भवगजविदारक मृगेंद्र ।। श्रीधरवरद आनंदसमुद्र ।। तो शिव ब्रह्मानंद यतींद्र ।। जो ॐ जगद्गुरु जगदात्मा ।। ११ ।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदा स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ।। सप्तमाध्याय गोड हा ॥ २१२ ॥ ॥ श्रीरस्तु ॥

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।

ते पुढे असेही म्हणतात की, श्रोतेजन हो, यापुढचा अध्याय हा आणखीन गोड आहे. त्यात त्या शिवयोग्यांनी भद्रायूवर कोणती कृपा केली, त्याचे वर्णन आलेले आहे. त्याचे पठण भाविक भक्तांनी अवश्य करावे आणि तो ब्रह्मानंद मिळवावा. ||२१०।। प्रापंचिक बुद्धीचा नाश करणाऱ्या त्या सिंहानेच मला आनंद देण्यासाठी हा ग्रंथरूपी ज्ञानसागर निर्माण केला आहे. तोच शिवाशी एकरूप झालेला माझा पिता अर्थात सद्‌गुरू ब्रह्मानंद आहे. तोच जगद्गुरू आणि जगदात्माही तोच आहे. ।।२११।। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा हा सातवा अध्याय शिव भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने आणि आदराने श्रवण करोत. ।।२१२।।

।। श्री सांबसदाशिवार्पणमस्तु ।।

Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Pachava
Shree Shivleelamrut Adhyay Pachava
Shree Shivleelamrut Adhyay Sahava
Shree Shivleelamrut Adhyay Sahava

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Satava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top