दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।।
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ।।
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
देवीच्या आरतीचा अर्थ | Devichi Aarathi Arth
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
अर्थ: हे दुर्गे देवी दुर्घट( दुर्घटना) तूझ्या वाजुन संसाररूपी संकट तरून जाण्यास कठीण आहे. हे अनाथांची नाथ, अंबा, जगदंबा तुझ्या करूणेचा विस्तार कर. आम्हाच्यावर कृपा कर. तीन वारी..तीन्ही लोकातुन मला आता शांती मिळवी. अध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे जे तीन ताप आहेत त्यातून तु आता माझी सुटका कर. माझ्या मार्गात ताप(संकट) येणारे अडथळे तु आता दुर कर देवी. मी पराभूत झालो आहे. हया जन्ममरणाच्या जक्ररातुन मला मृक्ती प्रदान कर. मोक्ष प्रदान कर. !!1!!
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
अर्थ: देवीचा जयघोष असो. महिषासूरास मारून हे देवी तु सर्वांस अभय दिले आहेस. जगण्याची संजीवनी प्रदान केली आहेस. सूराना आणि देवांना तारून त्यांना जिवनदानाचा वरच दिला आहेस !!धृ!!
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
अर्थ: त्रिभुवनात ( स्वर्ग, पृथ्वी आणि पाताल) हे देवी तुझ्यासारख कोणीच नाही. चार वेद ( ऋगवेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद) सुध्दा आता थकुन गेले आहेत तुझी किर्ती गाऊन तरीही तुझे गुण संपतच नाही आहेत. आता शब्दही सारे संपले पण तुझा महिमा काही संपत नाही. जे सहा वेदाअंग आहेत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद, ज्योतिष आणि जी सहा शास्त्र आहेत न्याय, वैशेषिक, संख्य, योग, मीमानसा, वेद त्यातही तुझे सत्यरूप उलगडले नाही आहे. तुझी किर्ती अगाध आहे.भक्त ती गाऊ शकत नसला तरीही तु तुझ्या भक्तांना लगेचच पावतेस.!!2!!
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
अर्थ: हे देवी तुझे रूप खुपच प्रसन्न आहेस. तुझे हे प्रसन्न रूप पाहुन तूझे जे खरे भक्त आहेत तेही प्रसन्न होऊन जातात. जे क्लेश आहेत राग, लोभ, द्वेष, अहंकार, अविद्या, मत्सर त्यांनपासून मोक्ष दे. अंबे तुझ्याशिवाय माझी ही आशा पुर्ण करण्याचे सामर्थ कोणातच नाही. तुझ्या पायांवर तल्लीन झालेला हा नरहरी विल्लिन होत आहे.!!3!!
Devichi Aarathi अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.
माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा | Mata Shailyaputra Katha
