माता ब्रह्मचारिणीची पौराणिक कथा (Mythological story of Mata Brahmacharini)
महर्षी नारदांच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन शंकराच्या प्रेमात पडले आणि भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, म्हणून तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले.हजारो वर्षे ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत जंगलात राहून केवळ फळे आणि फुले खाऊन कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिला तपश्चरिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. तीन हजार वर्षे गळून पडलेली वेलीची पाने खाल्ल्याने आणि नंतर कित्येक हजार वर्षे निर्जल आणि अन्नहीन व्रत पाळल्यामुळे अपर्णालाही देवीचे नाव पडले.असे केल्यावरच सप्तऋषींनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. आता लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येणार आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर घरी परत जा आणि योग्य वेळी तुझे लग्न भगवान शंकरासोबत होईल.
ब्रह्मचारिणी देवीचे स्वरुप
कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी देवीचे पूजन व मंत्र
सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. तसेच पूजनानंतर यथाशक्ती, यथासंभव देवीच्या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र पुढीलप्रमाणे
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।
ब्रह्मचारिणी देवीची महती
ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. सर्व देवतांनी आणि ऋषी, मुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.
Mata Brahmacharini अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.