Diwali Baddal Mahiti | दिवाळी बद्दल संपूर्ण माहिती

Diwali Baddal Mahiti

आपली हिंदू धर्माची संस्कृती फार जुनी आहे मित्रांनो. हजारो वर्षाची पूर्वीची संस्कृती आपली आहे आणि आपल्या या संस्कृतीमध्ये आपण सण जे साजरे करतो ना वर्षामध्ये येणारे सण प्रत्येक सण त्या सणाच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. म्हणून तो सण आपण साजरा करतो. याच्या पाठीमागे आपण दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला, आता आली आपली दिवाळी. आणि दिवाळी हा सण आपण का साजरा करतो त्याच्या पाठीमागचं काही कारण आहे मित्रांनो. आणि हे कारण आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये ग्रंथामध्ये लिहून ठेवले. परंतु आजच्या या कलियुगामध्ये ग्रंथ वाचायला कुणाला वेळ आहे मित्रांनो त्यासाठी आपण ब्लॉगच्या माध्यमातून Diwali Baddal Mahiti बघूया, दिवाळीचे कारण काय.

मित्रांनो त्याचं कारण असे या पृथ्वीतलावरती एक रक्तबीज नावाचा राक्षस होता. रक्तबीज नावाचा महाभयंकर राक्षस या राक्षसानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली घोर तपश्चर्या केली. अन्न पाणी काही न घेता जंगलात जाऊन तपश्चर्या केली. आणि त्या वेळेला ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्याला वरदान दिलं रक्त राक्षसाला. तुला कोणीही मारू शकणार नाही तुला ज्या वेळेला कोणी मारेल त्यावेळेला तुझं रक्त ज्यावेळेला जमिनीवरती पडेल त्यावेळेला त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून राक्षस तयार होईल. असं वरदान मिळाल्यानंतर रक्तबीज राक्षस आहे ना फार उन्मत्त झाला. हो इतका उन्मत्त राक्षस झाला की ऋषी मुनी सगळ्यांना तो त्रास द्यायला लागला. एवढेच नाही करून त्यांनी देवावरती चाल केली मित्रांनो स्वर्गावरती आक्रमण केलं आणि त्यावेळेला त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. इकडे तिकडे सगळे देव पळायला लागले. त्याला घाबरून त्यावेळेला तो आपलं सैन्य घेऊन कैलास पर्वतावरती आला. कैलास पर्वतावरती त्यावेळेला पार्वती माता त्या ठिकाणी होत्या.

आणि त्यावेळेला पार्वती मातांना बघून तो मोहित झाला तो पार्वती मातांना अंगावरती गेला हो मारण्यासाठी. त्यावेळेला महाभयंकर राग आला पार्वती मातांना आणि त्यावेळेला देवी पार्वतीने सांगितलं हे रक्तबीज राक्षसा दूर हो. तरी तो ऐकतोय कुठं त्याला वरदान होतं ब्रह्माचा. त्याला उन्मत्त झाला होता. ताकतीचा आणि त्याच वेळेला देवीला राग आला. पार्वती मातेंना आणि त्यांनी आपला प्रभू शिवशंकराचा त्रिशूल फेकून मारला. राक्षसाला त्रिशूल फेकून मारल्यानंतर त्या त्रिशूल मारल्यावर त्याच्या अंगातून रक्त खाली पडलं. मित्रांनो त्याच्या अंगातून आणि जमिनीवर पडल्यामुळे हजारो राक्षस त्याचं तयार झालं. हजारो राक्षस त्या वेळेला परत ते राक्षस युद्धासाठी पार्वती मातेवर तयार झालं. त्या वेळेला राक्षस न मेल्यामुळे महाभयंकर राग आला. पार्वती मातेला इतका राग आला की सगळं शरीर लालबुंद झालं. काळ पडलं शरीर इतका राग आला मातेला. आणि त्या वेळेला मातेने महाभयंकर महाप्रलय असं रूप धारण केलं. महाकालीचे रूप धारण केलं जीभ बाहेर गळ्यामध्ये मुंडक्यांची माळ आणि सर्व हातामध्ये शस्त्र. मित्रांनो असं महाभयंकर रूप धारण केलं की पृथ्वी आणि पाताळ सगळं हलायला लागलं होतं.

नुसतं इतकं रूप महाभयंकर रूप होतं त्या वेळेला हे रूप बघून रक्तबीज नावाचा राक्षस मित्रांनो हा पळायला लागला. पुढं त्या वेळेला देवीने त्याचा पाठलाग केला आणि त्यावेळेला मारायला चालू केलं. आपला त्रिशूळ मारला देवीनं आणि रक्तज राक्षसाचं मुंडकं उडावलं आणि त्याचं रक्त खाली पडू नये म्हणून खापराचं भांड घेतलं होतं त्या खापराच्या भांड्यात रक्त पडलं त्यामुळे रक्तबीजापासून राक्षस तयार झालेच नाहीत. त्यावेळेला त्याचा वध झाला आणि बाकीचे राहिलेले राक्षस होतं ना देवीने स्वतः गिळून टाकले. राक्षस एवढा मोठा महाभयंकर प्रलय रूप होतं आणि ज्या वेळेला रक्तबीज राक्षसाला मारलं त्या वेळेला देवी मित्रांनो महाभयंकर राग होता देवीचा. आणि त्यावेळेला देवीचा पाय पृथ्वीतलावर एक पाऊल पडलं तर ही पृथ्वीच काय मानवजात सृष्टी सगळी नष्ट होईल असं वाटू लागलं होतं.

पण देवीला थांबवणार कोण हा राग शांत करणार कोण सगळे देव भयभीत झाले होते. स्वर्गामध्ये त्यांना वाटलं आता काय होणार आपल्या सगळ्यांचं म्हणून हे सगळे देव प्रभू महादेवांकडे गेले. भोळे शिवशंकर महादेव त्यांच्याकडे गेले आणि हा प्रकार त्यांना सांगितला. त्यांना प्रश्न पडला की देवी पार्वती मातेला शांत करायचं कसं या महाकाली रूपाला शांत करायचं कसं. महाप्रलयकारी महा भयंकर रूप होते त्या वेळेला महादेवांना विचार पडला आणि महादेवांनी विचार केला की स्वतः आता आपण पुढे झोपलं पाहिजे. स्वतः प्रभू महादेव जमिनीवरती झोपले. देवी तिकडून नाचत आली महाकाली. महाकाली नाचत आल्यानंतर महाकालीचा पाय महादेवांना लागला आणि ज्या वेळेला पाय लागला त्यावेळेला त्यांना ज्ञात झालं देवीला की हे आपले पती आहेत महादेव शिवशंकर. आणि त्यावेळेला देवी शांत झाली.तो दिवस होता रक्तबीज राक्षसाला मारल्याचा. दिवस होता नरक चतुर्थी. आणि त्यामुळेच आपण त्या नरक चतुर्थी पासून दिवाळीला सुरुवात करतो. आणि दिवाळी सण साजरा करतो.

एवढेच आपल्या संस्कृतीचे उदाहरण नसून अजून एक उदाहरण आहे. सत्याने केलेला असत्याचा पराभव म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्राने रावणाला मारलं. मित्रांनो रावणाला मारून प्रभू श्रीरामचंद्र सीतेला घेऊन हनुमान प्रभू श्री रामचंद्र सीता हनुमान लक्ष्मण हे सगळे अयोध्येमध्ये आले. आणि तो दिवस होता दिवाळीचा आणि त्या दिवसापासूनच दिवाळी हा सण आपण साजरा करायला लागलो. ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये आले पावला पावला वर अयोध्ये वासियांनी दिवे लावले, फुलांचा वर्षाव केला. तो आनंद उत्सव साजरा केला म्हणजेच तो दिवस होता दिवाळीचा.

आपण आपल्या हिंदू संस्कृती वरती विश्वास ठेवा तुम्ही सायन्सचा पुरवा मागताल तर प्रत्येक सणामधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आहे आपल्याला जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी आपल्याला या सणामधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या जीवनाचा मार्ग जीवनाची नौका पार करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला होईल म्हणून आपण प्रत्येक सण आनंदात साजरा करा. मित्रांनो कितीही पैसा असेल तर आनंद हा कोणालाही विकत घेता येत नाही. आनंद हा साजरा करावा लागतो आणि तो साजरा करायचा असेल तो सणांच्या माध्यमातून होतो मांनला तर आनंद होतो. म्हणून आपल्या संस्कृती वरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक सण साजरा करा.

Vasubaras Ka Sajari Kartat? वसुबारस का साजरी करतात?

वसुबारस याला गुरु द्वादशी किव्वा गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मात्र महाराष्ट्रात दिवाळी सुरु होते ती वसुबारस या दिवसापासुन. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो. हिंदु धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे म्हणून या दिवशी गाईची वासरासह सायंकाळी पुजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतुने सुद्धा पुजा करण्याची पद्धत आहे.

वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी गोठ्यावर जाऊन गाईची अन तिच्या वासरांची आणि त्यासोबत गोठयातील इतर ढोरावासरांची मनोभावे पूजा केली जाते. गाईला बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेगांच्या भाजीचा नैवेद्य खाऊ घातल्या जातो. वसु बारस दिवशी सकाळीच रामाच्या पारात सडा सारवणं करुन रांगोळी काढली जाते. घरातील देवांचे आणि तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी शेतकरी या दिवशी गाईचे दूध काढत नाही ते वारसालाच पिऊ देतात. वसु बारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने घरांत फराळ बनवायची देखील लगबग असते.

वसु बारसच्या दिवशी सुर्य मावळला की मग मातीच्या पणत्या लावल्या जातात. पहिली पणती घरातल्या देवतांची असते, दुसरी कुलदेवतेची असते, तिसरी ग्रामदेवची, आणि मग चौथी गाईच्या गोठ्यातली आणि तिथून पुढच्या पणत्या ह्या घरावर दारासमोर ठेवुन दिपोत्सवला सुरुवात होते. शहरी भागात वसुबारस गौ-शाळेत जाऊन साजरी करतात किंवा बहुतांश लोक तर आता घरातच धातुची किंवा मातीची गायवासरांची मुर्ती आणून त्यांची मनोभावे पुजा करतांना दिसून येतात. अशा रितीने ग्रामीणभागात शहरीभागात मोठ्या आनंदाने वसुबारस साजरी होते.

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता‚ प्रसन्नता‚ शांतता आणि समृद्धी आपणास लाभो!

Dhantrayodashi ka Sajari Kartat । धनोत्रयदशी का साजरी करतात

आज आपण धनोत्रयदशी म्हणजे काय? हा सण का साजरा करतात? आणि त्याचे काय महत्व आहे. याबद्दल माहिती घेणार आहोत. दिवाळीतील धनोत्रयदशी एक महत्वाचा दिवस म्हणुन ओळखला जातो. धनोत्रयदशी ला धनतेरस सुद्धा म्हटले जाते. धन म्हणजे पैसे संपत्ती तसेच धन हा शब्द धन्वंतरीला सुचित करतो. आणि तेरस म्हणजे चंद्र महिन्यातील शुक्ल पक्षाचा किव्वा कृष्ण पक्षाचा तेरावा दिवस. धनोत्रयदशी हा सण हिंदु कॅलेंडर मधील आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाचा तेराव्या दिवशी साजरा केला जातो.

हिंदु पुराना नुसार धनोत्रयदशीला देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. यादिवशी ते, देव आणि दानवांमध्ये चालु असलेल्या समुद्र मंथनाच्यावेळी अमृताने भरलेला कलश घेऊन समुद्रातुन प्रगट झाले. म्हणुन ह्या दिवशी धन्वंतरी ची पुजा केली जाते. या दिवशी धन्वंतरी ची पुजा करून चांगले आरोग्य आणि दिर्घ आयुष्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. तसेच या दिवशी लक्ष्मी मातेची देखील पुजा केली जाते. कारण ह्या दिवशी समुद्र मंथनाच्यावेळी देवी प्रगत झाल्याचे ह्या मंथनात सांगितले आहे. ह्या दिवशी लक्ष्मीमातेची पुजा करून धन संपत्ती वाढावी अशी प्रार्थना केली जाते. ह्या दिवशी सोने व चांदीच्या वस्तु खरेदी करणे शुभ मानले जाते.

धन्वंतरीला आयुर्वेदाची देवता मानली जाते. ज्याने आयुर्वेदाचे ज्ञान दिले. व्यापारी लोग ह्या दिवशी लक्ष्मीमाता आणि वह्यांची पुजा करतात. वह्यांचा वापर ह्या दिवसापासून सुरु करण्याची प्रथा आहे.

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

नरक चतुर्दशी म्हणजे काय, नरक चतुर्थी ला काय करावे?

धनत्रयोदशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण दानवाचा वध हा केला आणि तेव्हापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी नरक चतुर्थी साजरी करित असतो. नरक चतुर्थी या सना पासून आपल्याला स्वतःच्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद नेहमीच वर आसावा अशी शिकवण आहे. दिवाळी ह्या पाच दिवस असणाऱ्या सणामध्ये नरक चतुर्थी ह्या सणाला खुप महत्व असते. चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करणे फार महत्वाचे आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान नरक चतुर्थीच्या दिवशी केले जाते. सर्व प्रथम सकाळी लवकर उठले पाहिजे. त्यानंतर सूर्यदेवाला अर्धा नैवेद्य दाखवावा.

दिवाळी उत्सवाच्या 5 दिवसांपैकी दुसरा दिवस नरका चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी म्हणून ओळखला जातो. कार्तिक महिन्यातील मावळत्या चंद्राच्या 14 व्या दिवशी साजरा केला जाणारा, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि दिवाळीच्या 5 दिवसांमधील सर्वात महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक आहे . या दिवसाची कथा नरकासुर या राक्षसावर भगवान कृष्णाच्या विजयाभोवती केंद्रित आहे, अंधारावर प्रकाशाचा विजय आणि पापावर धार्मिकतेचा विजय दर्शविते.

नरक चतुर्दशी उत्सवामागील कथा

नरका चतुर्दशीचे महत्त्व नरकासुराच्या कथेतून येते, ज्याने स्वर्गात कहर केला आणि अनेक स्त्रियांचे अपहरण केले. अखेरीस भगवान कृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी त्यांचा वध केला, बंदिवानांना मुक्त केले आणि शांतता पुनर्संचयित केली. पौराणिक कथेनुसार, नरकासुराचा वध पृथ्वीला पाप आणि नकारात्मकतेपासून शुद्ध करण्याचे प्रतीक आहे. म्हणूनच, हा दिवस अंधार आणि अशुद्धतेवर मात करण्याचे महत्त्व दर्शवतो, म्हणूनच हा दिवस दिवे आणि दिवे लावून साजरा केला जातो.

दक्षिण भारतात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी, असे मानले जाते की अभ्यंग स्नान म्हणून ओळखले जाणारे सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीर आणि आत्मा शुद्ध होते आणि कृष्णाने नरकासुराच्या दुष्कृत्यांपासून जग शुद्ध केले होते.

नरक चतुर्दशी परंपरा आणि विधी

दिवसाची सुरुवात अभ्यंगस्नानाच्या शुभ विधीने होते, जिथे कुटुंबातील सदस्य सूर्योदयापूर्वी स्नान करतात, शुद्धीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून सुगंधित तेल लावतात. शुद्ध आंघोळीनंतर, घरे मातीच्या दिव्यांनी सजविली जातात, ज्यांना डाय म्हणून ओळखले जाते, आणि रंगीबेरंगी रांगोळी नमुने. नरकासुराच्या पराभवाचे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या लहान दिवाळीला छोटे फटाके फोडणे सामान्य आहे.

सणासुदीचे पदार्थ

नरक चतुर्दशीला, कुटुंबे सणाचे पदार्थ खातात जे प्रदेशानुसार वेगवेगळे असतात. अनेक दक्षिण भारतीय घरांमध्ये, आदिरसम (गुळ आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली पारंपारिक गोड) आणि म्हैसूर पाक (तूप आणि बेसनापासून बनवलेले समृद्ध गोड) यांसारखे पदार्थ तयार केले जातात आणि सामायिक केले जातात. महाराष्ट्रात, लोकप्रिय स्नॅक्समध्ये पोहे आणि लाडू आणि बर्फी सारख्या मिठाईचा समावेश होतो.

Scroll to Top