Papai Baddal Chi Mahiti । Healthy 5+ पपईचे पोषणमूल्य

Papai Baddal Chi Mahiti

दोस्तांनो, पपई हे फळ तुम्हाला अजिबातच नवीन नाही. Papai Baddal Chi Mahiti म्हणजे अगदी सहजपणे उपलब्ध होणारं हे फळ, तुमचे आई-बाबा बाजारातून अनेकदा विकत आणत असतील. पपईचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कलिंगडाप्रमाणेच हे फळदेखील रसाळ असते. सौंदर्यप्रसाधनांमध्ये पपईचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. चला तर, जाणून घेऊया पपई या फळाबद्दल….


पपई बद्दल ची शास्त्रीय माहिती (Papai Baddal Chi Mahiti)

पपई ही वनस्पती कॅरिकेसी कुलातील असून, तिचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे. हे फळ मूळचे अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून, मेक्सिकोत प्रथम त्याची लागवड करण्यात आली. हल्ली या वृक्षाचा प्रसार जगातील उष्ण प्रदेशांमध्ये झालेला दिसून येतो. ब्राझील, मेक्सिको, नायजेरिया, इंडोनेशिया, चीन व पेरू या देशांत पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, ओडिसा, प. बंगाल, आसाम, केरळ, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत पपईची लागवड केली जात असून, देशात पपईचे एकूण उत्पादन प्रतिवर्षी सुमारे २६ लाख टन होते.


पपईचे पोषणमूल्य

पपईमध्ये अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांचा समावेश असतो. त्यात असलेले प्रमुख पोषक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत:

कॅलरी४३ कॅलरी प्रति १०० ग्रॅम
कर्बोदके१०.८२ ग्रॅम
प्रथिने०.४७ ग्रॅम
चरबी०.२६ ग्रॅम
फायबर१.७ ग्रॅम
विटामिन सी६०.९ मिलिग्राम (१०२% दैनिक गरज)
विटामिन ए४७४ माइक्रोग्राम (५३% दैनिक गरज)
फोलेट३७ माइक्रोग्राम (९% दैनिक गरज)
कॅल्शियम२० मिलिग्राम
पोटॅशियम१८२ मिलिग्राम
पपईचे पोषणमूल्य

पपई वृक्ष

पपई या वृक्षाचे खोड सुमारे ५ ते १० मीटर उंच असून, त्याला क्वचित फांद्या फुटतात. खोड नरम असते, कारण त्यात काष्ठ कमी असते. पाने साथी, एकाआड एक व मोठी (५० ते ७० सेंटिमीटर व्यासाची) असतात. पानांचा आकार हस्ताकृती असून, ती सात खंडांत विभागलेली असतात. देठ जाड, परंतु पोकळ असतात. नर व मादी झाडे वेगवेगळी असून, नर-फुले घोसात आणि मादी-फुले एक-एकटी येतात. मूलतः मृदु असलेले फळ मोठे, हिरवे व लांबट गोल आकाराचे असते. पिकल्यावर ते बाहेरून पिवळे आणि आत शेंदरी रंगाचे होते. पिकलेल्या फळातील गर गोड आणि तंतुमय असतो. फळात तपकिरी रंगाच्या बिया असतात.


आरोग्यदायी पपई

  • धूळ व धुरामुळे चेहऱ्यावर काळे दाग पडले असतील, तर त्यावर काकडी किंवा पपईचा गर लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. त्यामुळे चेहरा खुलतो व त्वचाही मुलायम होते.
  • आपल्या आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर, भाजी व सलाडद्वारे करू शकतो. पिकलेली पपई मधुर, वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते.
  • पोटाचे विकार, अपचन यांवर पपई गुणकारी असते. पपईच्या पानांपासून तयार केलेला चहा हृदयविकारामध्ये उपयोगी असतो.
  • दररोज पपई खाल्ल्याने उंची वाढते. शरीराचे संवर्धन होते.
  • पपई खाल्ल्याने पोटातील कृमी नष्ट होतात. पचन व्यवस्थित प्रकारे होते.
  • कच्च्या पपईची भाजी अथवा कोशिंबीर अजीर्णाचा त्रास असलेल्यांना वरदायी ठरते. मलावरोध, आतड्यांची दुर्बलता तसेच उदररोग व हृदयरोग यांवर पपईचे सेवन करणे हितावह ठरते.
  • खरूज व गजकर्ण यांवर पपईचा चीक लावल्यास बराच फायदा होतो. कच्चा पपईचा रस तोंडावर चोळून लावल्यास मुरुमे नाहीशी होतात.
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवते: पपईमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

पपईचे उत्पन्न

पपईची झाडे एक वर्षाची झाल्यावर त्यापुढे म्हणजे १२ ते १८ महिन्यांपर्यंत त्यापासून निवमित फळे मिळतात. त्यानंतर फळांचे आकारमान लहान होते व संख्याही घटते. भारतात प्रत्येक झाडाला साधारणतः एका वर्षात २० ते १५० फळे लागतात. महाराष्ट्रात प्रत्येक झाडाला सरासरी २७ फळे लागतात व फळाचे सरासरी वजन एक किलोग्रॅम असते. झाड ३ ते ४ वर्षपिक्षा जास्त काळापर्यंत राहू देणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसते.


पपई फळाची वैशिष्ट्ये

पपईचे फळ पौष्टिक आहे. त्यात पेक्टिन, पोटॅशियम, कॅल्शियम, अ व क जीवनसत्त्वे आणि पेपेन नावाचे द्रव्य असते. कच्च्या फळावर चिरा मारून स्त्रवलेल्या द्रवापासून पेपेन मिळवितात. पेपेन औषधी असून, ते प्लिहा आणि मासिक पाळीच्या विकारांवर देतात. तसेच लोकर, चीज, जेली, च्युइंग गम आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. जेलीपासून चेरी (टुटी-फ्रुटी) तयार करतात. मांस लवकर शिजावे म्हणून त्यात पपईची पाने किंवा कच्च्या फळांचे तुकडे घालतात. कच्ची पपई भाजीसाठीही वापरतात.


निष्कर्ष (Papai Baddal Chi Mahiti)

पपई हे एक महत्त्वपूर्ण आणि पोषक फळ आहे. त्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईची लागवड आणि उत्पादन सोपी असून त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. पपईचे व्यापारी महत्त्व देखील खूप आहे. पपईचा वापर विविध खाद्यपदार्थ, औषधे, आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्यामुळे पपईचा वापर आणि उत्पादन अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.


FAQ on Papai Baddal Chi Mahiti

पपई कधी खाऊ नये?

दुधासोबत पपई कधीच खाऊ नये.

पपई खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?

पाचक समस्या किंवा अस्वस्थता टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मांस, मासे किंवा टोफू सोबत पपई जोडणे टाळा. पपई हे कमी चरबीयुक्त फळ आहे आणि तळलेले पदार्थ, फॅटी मीट किंवा मलईदार सॉस यासारख्या उच्च चरबीयुक्त पदार्थांसोबत जोडल्यास पचनास त्रास होऊ शकतो.

पपई खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?

पपई खाल्ल्यानंतर लगेच थंड पाण्याचे सेवन केल्यास शरीराचे तापमान संतुलन बिघडू शकते . पपई शरीरात उष्णता निर्माण करते असे मानले जाते. जेव्हा थंड पाणी प्यायले जाते तेव्हा ते पचन आणि शोषणाच्या नैसर्गिक प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे चयापचय मंद होतो आणि संभाव्य अस्वस्थता येते.

पपई खाल्ल्यानंतर मी अंडी खाऊ शकतो का?

पपईतील पपेन लाल मांस, चिकन आणि अंडी यातील प्रथिनांचे पचन मंद करते . यामुळे अपचन आणि इतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे पपईला जास्त प्रमाणात प्रथिने असलेल्या अन्नाशी जोडू नका.


Papai Baddal Chi Mahiti साठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण Papai Baddal Chi Mahiti मराठी मध्ये मिळते.


फणस बद्दल तुम्हाला हि नवीन माहिती आहे का?

Limbu Baddal Chi Mahiti
Limbu Baddal Chi Mahiti

Scroll to Top