दोस्तांनो, या पोस्ट मध्ये आपण draksha baddal mahiti जाणून घेणार आहोत. उन्हाळा आला की, द्राक्षे, कलिंगड अशी गोड आणि रसाळ फळे खाविशी वाटतात, हो ना? आई-बाबांनी बाजारातून ही फळे आणल्यावर लगेच तुम्ही मुले त्यांचा फडशा पाडतात. द्राक्ष हे सगळीकडे अगदी सहजपणे उपलब्ध होणारं फळ आहे. आईस्क्रीम, फ्रूट सलाड, ज्यूस, जाम, जेली वगैरे तयार करण्यासाठीही द्राक्षे वापरली जातात. जाणून घेऊया, draksha baddal mahiti
Draksha Baddal Mahatvache । द्राक्षाबद्दल महत्वाचे
द्राक्ष ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. द्राक्षाच्या दोन प्रमुख जाती आहेत. पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. द्राक्षे प्रामुख्याने उन्हाळ्यात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ, मिरज या तालुक्यांमध्येही द्राक्षांचे उत्पादन होते. येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुके उत्पादनासाठी पोषक आहे. मनुके उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
- द्राक्षांचे शास्त्रीय परिभाषेतील नाव व्हिटिस व्हिनिफेरा आहे.
- जगभरातील १० लोकप्रिय फळांच्या यादीत द्राक्षांचा समावेश होतो.
- द्राक्षांच्या जगभरात ८००० हून अधिक जाती अस्तित्वात आहेत.
- द्राक्षांच्या जागतिक उत्पादनाच्या क्रमवारीत भारत १२ व्या स्थानावर आहे.
- आपल्या राज्यातील एकट्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे १.७५ लाख हेक्टर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेतले जाते.
- द्राक्षांना इंग्रजीत ‘ग्रेप्स’ असं म्हणतात. मात्र, ‘ग्रेप’ हा शब्द फ्रेंच भाषेतील ‘ग्रेपर’ या क्रियापदापासून तयार झाला आहे.
- स्पेनमध्ये द्राक्षे खाणे हा शुभशकुन मानतात.
तुम्हाला हे माहीत आहे का?
- द्राक्ष है मूळ आर्मेनियातील पीक आहे.
- द्राक्ष ही वनस्पती मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेश आणि पश्चिम आशियातील आहे. सुमारे ६,००० ते ८,००० वर्षांपूर्वीपासून जगभर द्राक्षवेलीची फळांसाठी लागवड केली गेली. भारतात इ. स. १३०० च्या सुमारास इराण व अफगणिस्तान येथून द्राक्षवेल आली असे मानतात.
- आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण द्राक्ष उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते.
- द्राक्षे शीत गोदामांमध्ये साठवली जातात आणि नंतर विक्रीसाठी परदेशात पाठवली जातात.
- मनुका किंवा बेदाणा ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोनाक्का, तास-ए-गणेश या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात.
- माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठीच पिकवतात. शरद जातीची द्राक्षे काळ्या मनुका तयार करण्यासाठी वापरतात.
आरोग्यदायी काळ्या मनुका | Aarogyadayi Kala Manuka
- काळ्या मनुक्यांमध्ये असलेले ओलेॲनोलिक ऍसिड दातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे काळ्या मनुक्यांच्या सेवनाने आपल्या दातांचे किडण्यापासून संरक्षण होते.
- काळे मनुके खाल्ल्याने ताप बरा होतो. त्यात अॅन्टिऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
- रात्रभर मनुके पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यानंतर शरीराला अनेक पौष्टिकत्तत्त्वे मिळतात. पित्ताचा त्रास कमी होतो.
- या मनुक्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठीही त्यांचा वापर केला जातो.
- तास-ए-गणेश
- थॉमसन
- मर्लो
- चोर्नी
- काळी साहेबी
- गुलाबी
- सुपर
- अनाबेशाही
- किशमिश
- सोनाक्का
- बंगलोर पर्पल
Grapes Health Benefits : द्राक्ष खाण्याचे फायदे काय?
- ऊर्जा पुरवणे: ड्राईड ग्रेप्स सुक्ष्म नांतर उर्जा पुरवतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे आमिनो एसिड्स आणि विटामिन्स असतात, ज्यामुळे ते ऊर्जा पुरवतात.
- बूस्ट इम्युनिटी: त्यात विटामिन सी आणि एंटिऑक्सीडंट्स असल्यामुळे, ड्राईड ग्रेप्स आपल्या प्रतिरक्षा प्रणालीला मदत करतात.
- हड्ड्यांसाठी फायदेशीर: ड्राईड ग्रेप्समध्ये कॅल्शियम, पॉटॅशियम, आणि मॅग्नेशियम यासारख्या तत्त्वांची अचूक मात्रा आहे, ज्यामुळे हड्ड्यांची कठोरता वाढते.
- रक्तदाब नियंत्रणात राहतो – द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे.
- थकवा दूर करण्यासाठी – द्राक्षामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामुळे थकवा दूर होतो.
FAQ on Draksha Baddal Mahiti
द्राक्षे खाण्याची योग्य वेळ कोणती आहे?
द्राक्षे खाण्याची योग्य वेळ दुपारी जेवणाच्या आधी आहे. सकाळी रिकाम्या पोटी कधीही द्राक्षे खाऊ नयेत. रिकाम्या पोटी द्राक्षे खाल्ल्याने पोटात गॅस, आंबट ढेकर आणि पचनासंबंधी समस्या होतात. रात्रीच्या वेळेसही द्राक्षे खाऊ नयेत.
द्राक्षांमध्ये कोणती जीवनसत्त्वे असतात?
द्राक्षांमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली अनेक खनिजे असतात – पोटॅशियम, मँगनीज आणि जीवनसत्त्वे बी, सी आणि के यांचा समावेश असतो.
काळ्या द्राक्षांना इंग्रजीत काय म्हणतात?
कॉनकॉर्ड द्राक्षे म्हणूनही ओळखले जाते, द्राक्षांचा एक प्रकार आहे जो गडद जांभळा किंवा जवळजवळ काळ्या रंगाचा असतो. ते त्यांच्या गोड चवसाठी ओळखले जातात आणि सामान्यतः द्राक्षाचा रस, जाम आणि वाइन तयार करण्यासाठी वापरले जातात.
द्राक्षे आरोग्यासाठी चांगली आहेत का?
द्राक्षातील पोषक घटक कर्करोग, डोळ्यांच्या समस्या, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि इतर आरोग्य परिस्थितींपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात . रेस्वेराट्रोल हे द्राक्षातील एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे जे आरोग्यासाठी फायदे देऊ शकते.
किवी बद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.