किवी बद्दल शास्त्रीय माहिती
Kiwi Baddal Sampurn Mahiti in Marathi pudhe baghu. किवी हे हिरवट, चॉकलेटी रंगाचे केसाळ आणि आंबट-गोड चवीचे फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाया पक्षी प्रसिद्ध असला, तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून, चीनमधील आहे. चीनचे हे राष्ट्रीय फळ आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अक्टिनिडिया डेलिसिओसा असे आहे. समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ चांगल्या तन्हेने होते. चीन, न्यूझीलंडप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, सिक्किम, उत्तर प्रदेश, मेधालय या राज्यांत व निलगिरी पर्वतरांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न घेतले जाते.
किवी खाण्याचे फायदे
- ज्या लोकांना हृदयरोग आहे, त्यांना बऱ्याचदा किवी खाण्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो। उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर किवी फळ खावे त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येईल।
- कमी कॅलरीजमुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ एखाद्या औषधापेक्षा कमी नाही। यामुळे साखरेची पातळी कमी होते। किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात। त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो। सुरकुत्या दूर होतात।
किवीमध्ये कोणते पोषक घटक असतात?
किवी मध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते। जे लोक आपल्या फिटनेस ची विशेष काळजी घेतात त्यांनी किवी नक्कीच खावे। या फळांमध्ये पोटॅशियम, विटामिन सी आणि फायबर आढळतात। ही तत्वे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात। दररोज एक मध्यम आकाराची किवी खाणे आपल्यासाठी पुरेसे ठरते.
किवी बद्दल तुम्हाला हे माहीत आहे का? | Kiwi Baddal Sampurn Mahiti in Marathi
- किवी पोटातील अल्सर बरे करण्यासाठी मदत करू शकते.
- किवीमध्ये लोह आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते गरोदर महिलांसाठी उपयुक्त आहे.
- किवीचे सेवन करणे आपल्या हाडासाठी देखील फायदेशीर आहे त्यामुळे सांधेदुखी कमी होते दूर होते.
- जे लोक मानसिक समस्यांना बळी पडतात त्यांनी तणाव कमी करण्यासाठी किवी खाणे आवश्यक आहे.
किवी ची लागवड कशी होते?
किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखा एक वेल असतो। त्यांना फुलेही येतात। नैसर्गिकरित्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना आकर्षक वाटावी अशी नसतात, पण या फळाचे उत्पादन घेणारे शेतकरी या फुलाचे परागकण वाफाळून फुलांच्या आणि झाडांच्या प्रजननास मदत करतात। ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माशा किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माशा सोडल्या जातात। जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी आठ पोळी असे प्रमाण असते। झाड फुलांनी बहरले की, माशा माशांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते। या स्पर्धेपोटीच परागीकरण घडविले जाते.
Video – Kiwi Baddal Sampurn Mahiti in Marathi
द्राक्षाबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?
संक्षेप (Conclusion)
किवी हा एक अत्यंत आरोग्यदायी आणि स्वादिष्ट फळ आहे जो आपल्या आरोग्याला मदत करू शकतो. त्याच्या अधिक प्रयोगांसाठी आपल्या आहारात किवी समाविष्ट करा आणि आरोग्याच्या फायद्यांचा आनंद घ्या.
FAQ on Kiwi Baddal Sampurn Mahiti in Marathi
किवी फळ कधी खावे?
किवी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी कारण ते तुम्हाला ऊर्जा देते आणि तुमची प्रणाली डिटॉक्सिफाय करते.
वजन कमी करण्यासाठी किवी निरोगी आहे का?
होय. किवी सारखी फायबरयुक्त फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरते. यामुळे भूक कमी होते. बऱ्याच फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक देखील असतात जे तुमच्या संपूर्ण आरोग्यास समर्थन देतात आणि वजन कमी करतात.
एक दिवसाला किती किवी खावे? जास्त किवी खावे का?
किवी फळांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने एलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते . यामुळे पुरळ, दमा, अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी आणि स्थानिक तोंडाची जळजळ यासह शरीरात सूज येऊ शकते. फळे जास्त खाल्ल्यामुळे बऱ्याच लोकांना ओरल ऍलर्जी सिंड्रोम (ओएएस) देखील झाला आहे. म्हणून एक दिवसाला जास्त किवी खाऊ नये.
अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.