भारताच्या दक्षिण भागात महिलारोप्य नावाचे एक शहर होते. तिथे अमरशक्ती हा राजा राज्यकारभार करत होता. अतिशय आनंदात आणि प्रजेच्या हिताचा राज्यकारभार सुरू होता. परंतु राजाला एक दुःख होते. त्याचे बहुशक्ती, अनेकशक्ती व उग्रशक्ती हे तिघेही राजपुत्र आळशी होते. राज्यकारभार, जनता याविषयी त्यांच्या मनात कसलीही आदराची भावना नव्हती. माझ्यानंतर राज्याचे काय होईल, असा प्रश्न राजाला नेहमी पडत. त्याने एक उपाय काढला. आपल्या राज्यातील ज्ञानी, विद्वान पंडितांना बोलावून घेतले व त्यांना आपले दुःख सांगितले. माझ्या तिन्ही मुलांना जो ज्ञानी करेल, राजाला आवश्यक असणारे, धर्मशास्त्र-नीतिशास्त्र, राज्यशास्त्र हे शिकवून शहाणा करेल, राज्यकारभार करण्याचे धडे देईल आणि त्यांच्यामध्ये बदल करेल, त्यांना मी हवे तेवढे द्रव्य देईल.
राजांच्या मुलाचा स्वभाव सर्व पंडितांना माहीत असल्यामुळे, ही जबाबदारी घ्यायला कोणीही तयार होईना. तेवढ्यात विष्णुशर्मा नावाचा विद्वान उठून उभा राहिला व राजाला म्हणाला, “राजन, मी अनेक वर्ष तपश्चर्या केली आहे. मी पूर्ण प्रयत्न करून, तुमच्या मुलांना सहा महिन्यांत सर्व कार्यात निपुण करीन. मला धनाची अपेक्षा नाही. परंतु ज्ञानदान हा माझा धर्म आहे आणि तो मी पूर्ण करेल.” तीनही राजपुत्रांना घेऊन विष्णुशर्मा अरण्यात गेले आणि त्यांना समजेल अशा भाषेत पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगितल्या. त्यातून वेगवेगळ्या नीतिकथा, राज्यशास्त्रातील, साहस, न्यायकथा व राज्यकारभारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूल्यांच्या कथा सांगून, सहा महिन्यांत, तीनही राजपुत्रांना राज्यकारभाराच्या बाबतीत निपुण बनवले. याच कथांना पंचतंत्र म्हणतात. सर्व मनुष्यमात्रांसाठी या कथांतून सांगितलेली जीवनमूल्ये महत्त्वाची आहेत. अनेक संस्कार या कथांतून आपण घेतोच, त्याचबरोबर पशुपक्ष्यांविषयीही आपल्या मनात आदर आणि प्रेम निर्माण होते.
Chimni chi Goshta Marathi | चिमणी ची गोष्ट
असेच अजुन प्रश्न बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.