Healthy Badam Baddal Mahiti | बदाम बद्दल माहिती | 5+ Bdamache Prakar

Badam Baddal Mahiti

दोस्तांनो, आपण Badam Baddal Mahiti घेणार आहेत. काजू आणि बदाम यांची जोडगोळी खूपच प्रसिद्ध आहे. कोणत्याही गोष्टीत काजू घातले की, त्याबरोबर बदामही घातलेच जातात, हो ना? तुम्हा मुलांनाही बदाम शेक, आईस्क्रीम, कुल्फी असे विविध पदार्थ खायला आवडतात. तसेच, बदामाचे औषधी गुणधर्मही खूप आहेत. स्मरणशक्ती वाढावी यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. चला तर, जाणून घेऊया बदामांची अधिक माहिती (Badam Baddal Mahiti).


Badam Baddal Shashtriya Mahiti । बदाम बद्दल शास्त्रीय माहिती

बदाम हा पानझडी वृक्ष रोझेसी कुलातील असून, त्याचे शास्त्रीय नाव ‘प्रूनस डल्किस’ आहे. गुलाब व नासपती या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. बदाम वृक्ष मूळचा इराणमधील असून, नंतर त्याचा प्रसार इतरत्र झाला असावा, असे मानतात. हल्ली दक्षिण युरोप, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. गोड बदाम आणि कडू बदाम असे बदामांचे दोन प्रकार आहेत. प्रूनस डल्किस या जातीच्या बिया गोड आणि प्रूनस डल्किस अमारा या जातीच्या बिया कडू असतात. बदामाचे दाणे म्हणजे बदाम वनस्पतीच्या बिया आहेत.


Badamachya Jhadabaddal Mahiti । बदामाच्या झाडाबद्दल माहिती

बदामाचा वृक्ष सु. १२ मी.पर्यंत उप हाहू शकतो. खोडाचा व्यास सुमारे ३० सेटिभीटर असतो. लहान फांद्या सुरुवातीला हिरव्या असून, नंतर सूर्यप्रकाशामुळे त्या जांभळट होऊन हळूहळू राखाडी होतात. पाने साथी, एका आड एक, भाल्यासारखी व ७ ते १२ सेंटिमीटर लांब असून, कडा दंतुर असतात. फुले एकेकटी किंवा जोडीने येतात. गोड बदामाच्या फुलांचा रंग फिकट गुलाबी, तर कडू बदामाच्या फुलांचा रंग गडद गुलाबी असतो. फळ आठळीयुक्त व एकबीजी असते. बदामाचे बी चपटे, सुरकुत्या असलेले व चवीला गोड किंवा कड्डू असते. गोड बदाम आकाराने लहान, तर कडू बदाम मोठे असतात.


Badam Khanyache Fayade । बदाम खाण्याचे फायदे

बदाम खाण्याचे खूप फायदे आहेत, जसे की

 • बदाम हा सुक्यामेव्यातील प्रमुख घटक असून, त्याचा वापर मिठाई, आइस्क्रीम व केक यांमध्ये केला जातो.
 • कमी शर्करेमुळे व जास्त तंतूंमुळे मधुमेही रुग्णांना आहार म्हणून त्याचा उपयोग होतो.
 • १०० ग्रॅम बदामांपासून २१-७ ग्रॅम कर्बोदके, ४९ ग्रॅम मेद, २१ ग्रॅम प्रथिने, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियमयुक्त खनिजे, ई आणि ब-समूह जीवनसत्त्वे उपलब्ध होतात. त्यामुळे बदाम पौष्टिक आहे.
 • हृदयाचे विकार, तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी बदाम उपयुक्त ठरतात.
 • बदामांच्या तेलामुळे त्वचा मुलायम होऊन उजळते. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये तेलाचा वापर करतात.

Badam Madhil Aushadhi Ghatak (Badam Baddal Mahiti) । बदाम मधील औषधी घटक

बदामात १४ प्रकारांची ऑमीनो आम्ले असतात. त्यांपैकी ग्लुटामिक आम्लाचे प्रमाण सर्वाधिक असून, त्या खालोखाल अॅस्पार्टिक आम्लाचे प्रमाण आहे. गोड बदाम आणि कडू बदाम यांच्यातील तेल सारखेच असते. कडू बदामांमध्ये अॅमिग्डॅलीन आणि प्रूनेंसीन ही ग्लुकोसाइड असतात. त्यांवर विकरांची क्रिया होऊन हायड्रोजन सायनाइड तयार होते. त्यामुळे कडू बदामाचे अतिसेवन प्राणघातक ठरते. कडू बदामापासून मिळालेल्या तेलातील सायनाइडयुक्त संयुगे वेगळी करून ते बदामाचे तेल म्हणून वापरतात. मात्र, लागवड करायची झाल्यास गोड बदामाच्या वृक्षांची करतात.


Badamache Prakar Konte? | बदाम चे प्रकार कोणते?

बदामांचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

साधे बदाम (Sweet Almonds)

 • ही साधारणपणे खाण्याकरिता वापरली जातात.
 • त्यांची चव गोड असते.
 • अनेक पदार्थांमध्ये, विशेषतः मिठाई आणि बेकरी उत्पादनांमध्ये वापरले जातात.

कडू बदाम (Bitter Almonds)

 • हे खाद्य पदार्थांमध्ये थेट वापरण्यासाठी योग्य नसतात कारण त्यात अमिग्डालिन असते, ज्यामुळे सायनाइड तयार होतो.
 • यांचा वापर सुगंधी तेले किंवा अर्क बनवण्यासाठी केला जातो, परंतु त्यांच्या विषारीपणामुळे त्यांचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

शेल बदाम (In-shell Almonds)

 • या प्रकारातील बदामांना कवच असते.
 • ह्या बदामांना सामान्यतः सणासुदीच्या काळात विकले जाते.
 • ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी कवचासह साठवले जातात.

ब्लांच्ड बदाम (Blanched Almonds)

 • या बदामांची साले काढलेली असतात.
 • त्वचा उकळत्या पाण्यात बुडवून काढली जाते.
 • मुख्यतः डेसर्ट आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये वापरले जातात.

रोस्टेड बदाम (Roasted Almonds)

 • या बदामांना भाजलेले असते.
 • त्यात अतिरिक्त चव असते आणि कधी कधी मसाले आणि मीठ लावलेले असते.

स्मोक्ड बदाम (Smoked Almonds)

 • हे बदाम धुरकट केलेले असतात ज्यामुळे त्यांना विशेष प्रकारची चव येते.

स्लाईस्ड बदाम (Sliced Almonds)

 • या बदामांना पातळ कापलेले असते.
 • हे सजावटीसाठी आणि अनेक पाककृतींमध्ये वापरले जातात.

हे विविध प्रकारचे बदाम त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे आणि उपयोगामुळे ओळखले जातात.


Badam Baddal Mahiti वरील सामान्य प्रश्न । FAQ on Badam Baddal Mahiti

दररोज किती बदाम खावे?

बऱ्याच घरांमध्ये, लहान मुले आणि प्रौढांना त्यांच्या उंचीनुसार खाण्यासाठी बदाम दिले जातात. उदाहरणार्थ, जर मुल 4-10 वर्षांचे असेल तर त्याला दररोज 2-4 बदाम खायला देतात. 18-20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 6-8 बदाम दिले जातात.

बदाम कधी खावेत?

बदाम भिजवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्री ३-४ बदाम भिजवून सोलून सकाळी खाणे . यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल जी सकाळी सर्वात जास्त आवश्यक असते.

मी बदाम खाल्ल्यानंतर पाणी पिऊ शकतो का?

शेंगदाणे किंवा त्यामध्ये जास्त तेल असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्ननलिकेत चरबी जमा होऊ शकते, परिणामी चिडचिड आणि खोकला होऊ शकतो.


कलिंगडाचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

kalingad
Kalingad

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top