3 उत्कृष्ट मराठी गोष्टी | Marathi Goshti for Kids | Excellent Marathi Goshti

खूप शिका मोठे बना (Marathi Goshti for Kids)

दौलतपूर नावाचे एक खेडे आहे.

तेथे गौतम नावाचा मुलगा राहतो

गौतम आज फौजदार झाला

गावकरी गौतम चे कौतुक करीत आहेत.

कौतुकाचं कारणही तसच आहे.

गौतमचे आई वडील खूप गरीब आहेत.

शिक्षणासाठी ते गौतमला काहीही मदत करू शकले नाहीत.

गौतमला खूप शिकवायचे होते.

मग तो एका फौजदाराच्या घरी घरकामास राहिला.

काम करून तो शाळेत जात असे.

तो शाळेत नियमित जाई व खूप शिके.

गौतमला पोटभर खायलाही मिळायचे नाही.

पण गौतमने शाळा सोडली नाही.

गौतमचं गोड वागणं व कामसूपणा फौजदारांना खूप आवडे.

फौजदारानीच गौतमला शिकवले व फौजदार केले.

फौजदारांच्या हातून गौतमचा गौरव केला.

गौतमला शाबासकी देत फौजदार बोलले की,

मुलांनो, खूप शिका व गौतमसारखे मोठे बना.


उंट आणि कोल्ह्याची दोस्ती

एक होता कोल्हा व एक होता उंट. दोघी चांगले दोस्त होते.

एक दिवस उंटाला खूप भूक लागली. कोल्हा म्हणाला, या नदीच्या पलीकडच्या किनारी उसाचे शेत आहे.

शेतात जाऊन भरपूर ऊस खाऊ.उंटाला कोल्ह्याची ही कल्पना आवडली. उंट कोल्ह्याला म्हणाला. चल बैस पाठीवर.

कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला. दोघी पलीकडच्या नदी किनारी पोहोचले. समोरचा उसाचे शेत होते. दोघी शेतात घुसले.

उंट हळू हळू ऊस खाऊ लागला. कोल्ह्याने भरभर भरपूर ऊस खाल्ला. मग कोल्हा ढेकर देत म्हणाला.

उंट भाऊ आता मला गाण्याची लहर आली आहे.गाऊ का? उंट म्हणाला,अरे थोड्या वेळाने गा? मला नीट ऊस खाऊदे ना.

पण कोल्ह्यानी ऐकलेच नाही. कोल्हा लागला गायला. इतक्यात शेतातील लोक हातात काठ्या घेऊन आले. कोल्हा पळून गेला.

उंटाला खूप मार पडला. बिचारा उंट थकून परत घरी निघाला. तेवढ्यात कोल्हा आला. उंटाची क्षमा मागू लागला. पण उंट काही बोलला नाही.

कोल्हा त्याच्या पाठीवर बसला. पाण्याच्या मध्यभागी आल्यावर उंट म्हणाला, आता मला पोहण्याची लहर आली आहे.

कोल्हा म्हणाला असे नको करू. मी मरून जाईल. पण उंटाने ऐकले नाही त्याने पाण्यात डुक्की मारली.

कोल्हा पाण्यात पडला. तो म्हणाला मी तुझा मित्र आहे. उंट म्हणाला, लबाड मित्राची संगत मला नको. ही खरी दोस्ती नसते.

असेच अजुन गोष्टी बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.


दोघांचे भांडण

एका घरात दोन मांजरी होती. दोन्ही मांजरे पांढरी पांढरी व सुंदर होती.

पण दोघेही खूप भांडखोर होती. एकमेकांशी सारखी भांडायची. एक दिवस एका मांजराला सापडली चपाती.

लगेच दुसरे मांजर बोलले: मी आधी चपाती पाहिली होती. चपाती माझी आहे. झाले! दोघे लागले भांडायला.

उंच झाडावर एक वानर बसले होते. ते उडी मारून खाली आले. बोलले थांबा थांबा भांडू नका. मी चपातीची सारखी वाटणी करून देतो.

वानराने चपाती घेतली व दोन तुकडे केले. एक तुकडा केला मोठा एक केला लहान.

तुकडा बघून बोलला: अरे आता सारखे तुकडे करतो हः मग वानरानी मोठा तुकडा थोडा तोंडात टाकला.

मग दुसरा तुकडा थोडा तोडून तोंडात टाकला. असे करत करत वानराने सगळी चपाती गटंम केली.

चपाती संपताच ते उंच झाडावर निघून गेले. मांजरी बिचारी एकमेकांची तोंडं बघत बसली. भांडण झाले दोघांचे पण लाभ झाला वानराचा!

GK Question on Units of Measurement in Marathi | मोजण्याची एकके


रेघ लहान झाली – अकबर बिरबलाची गोष्ट

अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशहा अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले, “ही रेख पाहिलीस? ही रेघ लहान करायची; पण पुसायची नाही. जमेल तुला?”

बिरबलाने एक वेळ बादशहाकडे व एक वेळ रेघेकडे पाहिले. थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघे शेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “महाराज, झाली की नाही तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला!

Scroll to Top