दिवाळी सण: वसुबारस ते भाऊबीज, दिवाळीच्या 6 दिवसांची संपूर्ण माहिती (Diwali Baddal Mahiti)
दिवाळी सण हा आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा, सर्वात आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. अंगणात पणत्यांची रांग, दारात रांगोळी, आकाशात कंदील आणि घरभर फराळाचा सुगंध, ही दिवाळीची खरी ओळख. दिवाळी सण असो किंवा इतर कोणताही, आपल्या प्रत्येक सणामागे काहीतरी कारण आणि शिकवण असते. नुकताच आपण दसरा म्हणजे विजयादशमी साजरा केला, आणि आता वेध लागतात दिवाळीचे. पण

